बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनला अनेक वेळा हॉलिवूडमधून प्रस्ताव येत असतात. परंतु, त्याला आकर्षित करेल असे कथानक अद्याप मिळाले नसल्याचे तो म्हणतो. एका मुलाखती दरम्यान या विषयी बोलताना तो म्हणाला, हॉलिवूडचे प्रस्ताव नेहमीच येत असतात. अनेकवेळा हॉलिवूडची कथानके माझ्याकडे येत असतात. मी ती वाचतो, परंतु मला आकर्षित करेल, असे कथानक अद्याप मिळालेले नाही. आत्तापर्यंत त्याच्याकडे पाच ते सहा हॉलिवूड चित्रपटांची कथानके येऊन गेली आहेत. गेल्या तीन वर्षांतील जिंदगी ना मिलेगी दोबारा, अग्निपथ आणि क्रिश ३ सारख्या यशस्वी चित्रपटांच्या मालिकेनंतर बँग बँग चित्रपटाद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी लवकरच त्याचे रुपेरी पडद्यावर आगमन होत आहे. २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद याचे आहे.

Story img Loader