अश्लीलता आणि बीभत्सतेच्या कारणावरून सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या एआयबी नॉकआउट या कार्यक्रमात सहभागी झाल्याप्रकरणी आपल्याविरोधातील गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण हिनेही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने तिच्या याचिकेवरील सुनावणी १६ मार्चपर्यंत ठेवून तोपर्यंत तिला अटक करू नये, असे आदेश पोलिसांना दिले आहेत.
याच संदर्भात निर्माता करण जोहर याच्या याचिकेवरही १६ मार्च रोजीच सुनावणी होणार आहे. सामाजिक कार्यकत्रे संतोष दौंडकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत गिरगाव न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर ताडदेव पोलिसांनी कार्यक्रमाचे आयोजक आणि यात सहभागी झालेला करण जोहर,  अर्जुन कपूर, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, आलिया भट यांच्यासह १४ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता.

Story img Loader