छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये नट्टू काका ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते घनश्याम नायक यांचे ३ ऑक्टोबर रोजी निधन झाले आहे. ते ७८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. आता घनश्याम यांच्या मुलाने वडिलांच्या मृत्यू पूर्वीच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
घनश्याम यांचा मुलगा विकासने नुकतीच ईटाइम्सला मुलाखत दिली आहे. तेव्हा तो म्हणाला, ‘शेवटच्या काही दिवसांमध्ये त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. आम्ही त्यांच्यासाठी घरातच ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत होतो. पण नंतर आम्हाला त्यांना घेऊन रुग्णालयात जावे लागले. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. निधनाच्या १५ दिवस आधी त्यांना त्यांचे नाव देखील लक्षात नव्हते.’
Video: ‘हिचे चालणे पाहून डोनल्ड डकची आठवण आली’, मलायका अरोरा पुन्हा ट्रोल
घनश्याम नायक ‘तारक मेहता …’या मालिकेत वयाच्या ७७व्या वर्षापर्यंत काम करत होते. मात्र कॅन्सरवर उपचार सुरु असल्याने त्यांनी हा शो सोडला. ‘बेटा’, ‘लाडला’, ‘क्रांतिवीर’, ‘बरसात’, ‘घातक’, ‘चाइना गेट’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘लज्जा’, ‘तेरे नाम’, ‘खाकी’ या सारख्या अनेक सिनेमांमध्ये घनश्याम नायक यांनी महत्वाच्या भूमिका साकाराल्या होत्या.