संगीतकार अनु मलिक यांच्यावर झालेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांनंतर त्यांचा भाचा आणि प्रसिद्ध संगीतकार-गायक अमाल मलिक याने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. अनु मलिक माझ्या कुटुंबाचा भाग नाहीत, हे संपूर्ण प्रकरण अत्यंत अपमानास्पद होतं, असं तो म्हणाला. प्रसिद्ध पार्श्वगायिका सोना मोहपात्रा आणि श्वेता पंडित यांच्यासोबतच आणखी दोन महिलांनी अनु मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘माझ्या कुटुंबातील पहिले चार व्यक्ती हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आणि त्यापलिकडे मी कोणालाच कुटुंबाचा भाग मानत नाही,’ असं त्याने स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे #MeToo ‘मीटू’ मोहिमेला त्याने पाठिंबा दर्शविला. यासोबतच महिलांनी आरोपींना थेट कोर्टात खेचावं असंही तो म्हणाला. ‘सोशल मीडियावर काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने घेतल्या जातात. म्हणून महिलांनी न्यायालयीन पद्धतीवर विश्वास ठेवून त्याची मदत घ्यावी,’ असा सल्ला त्याने दिला.

वाचा : आमिरसोबतच्या नात्यावर फातिमा म्हणते, ‘मी हरामी असती तर..’

अमाल मलिक आणि सोना मोहपात्रा यांच्यात चांगली मैत्री आहे. सोनानेही अनु मलिक यांच्यावर आरोप केले होते. यावर तो म्हणाला, ‘जर सोनाने असं म्हटलं असेल तर नक्कीच त्यामागे काहीतरी कारण असेल आणि जर खरंच काही कारण असेल तर त्यांनी कोर्टात नक्की जावं.’

अनू मलिकने सोना मोहपात्रा आणि श्वेता पंडितचे आरोप फेटाळून लावले आहेत. या आरोपांमुळे त्यांना ‘इंडियन आयडॉल’ या रिअॅलिटी शोचं परीक्षकपद गमवावं लागलं होतं.