बॉलिवूड अभिनेता हिमांश कोहलीसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आयुष्यातील अनपेक्षित घडामोडींमुळे आपण नैराश्यात असल्याचंही नेहानं कबुलही केलं होतं. काही दिवसांपूर्वी तिनं ब्रेकअपचं खरं कारणंही सांगितलं होतं. हिमांश माझ्या योग्यतेचा नव्हता असा तिचा सूर त्यावेळी होता. मात्र आता नेहा हिमांशची पाठराखण करण्यास पुढे आली आहे.
हिमांशनं नेहाचा विश्वासघात केला म्हणून हे नातं तुटलं अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत्या. मात्र नेहानं या चर्चा साफ खोट्या असल्याचं म्हटलं आहे. तसेच अफवा पसरवणाऱ्यांवर तिनं कडाडून टीकाही केली आहे. ‘हिमांशनं मला दुखावलं हे खरं असलं तरी त्यानं माझा कधीही विश्वासघात केला नाही. तो एक विश्वासू व्यक्ती आहे. त्याला दोष देणं थांबवा. सत्य जाणून न घेता एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करणं चुकीचं आहे.’ असं नेहानं ट्विट करत म्हटलं आहे.
I read some article online which was Fake & Disturbing. Yes I said I’m hurt but I NEVER said I got betrayed. When it comes to being Loyal, He’s TheBest! So plz Stop blaming him & putting Wrong Allegations. We just can’t spoil anybody’s reputation without even knowing the facts!
— Neha Kakkar (@iAmNehaKakkar) February 26, 2019
नेहा आणि हिमांश लग्न करणार अशा चर्चा सुरू असताना एका अनपेक्षित वळणावर या दोघांचंही नातं संपलं. हिमांशला माझा अमुल्य वेळ मी देत होते, तरीही मी वेळ देत नाही अशी त्याची नेहमीच तक्रार असायची. तो माझ्या योग्यतेचा नव्हताच म्हणून मी नातं तोडलं, असं म्हणत पहिल्यांदाच नेहानं आपल्या ब्रेकअपचं कारण जाहीरपणे सांगितलं होतं. या स्पष्टीकरणानंतर मी आता सुखी आहे आणि यापुढे मला कोणाच्याही प्रेमात पडायचं नाही असंही ती म्हणाली.