सुपरस्टार रजनिकांत यांनी भाजप नेते नरेन्द्र मोदी आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे लोकसभा निवडणूकीत मिळवलेल्या घवघवित यशासाठी अभिनंदन केले. टि्वटरवरील आपल्या संदेशात ते म्हणताता, प्रिय मोदीजी ऐतेहासीक विजयासाठी तुमचे अभिनंदन. त्याचप्रमाणे जयललितांचे अभिनंदन करतानाच्या टि्वटरवरील आपल्या संदेशात ते म्हणतात, तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललितांजींनी राज्यात मिळवलेल्या अभूतपुर्व विजयाबद्दल अभिनंदन. रजनिकांत यांनी अलिकडेच टि्वटरवर खाते उघडले आहे.

Story img Loader