हेमा मालिनी आणि धमेंद्र यांची मुलगी आहाना देओल हिचे बिझनेसमॅन वैभव याच्याशी लग्न ठरले आहे. गेल्याचवर्षी ईशा देओल बिझनेसमॅन भारत तख्तानी याच्याशी लग्नगाठीत बांधली गेली होती. आम्ही सगळे फार आनंदी आहोत, तसेच लग्नाची तारीख अद्याप ठरलेली नाही, असे हेमा मालिनी म्हणाल्या. आहाना आणि वैभव यांचा साखरपुडा सोहळा शुक्रवारी सायंकाळी पार पडला. आहाना ही उडिसी नृत्यांगणा आहे. ती हेमा मालिनी आणि बहिण ईशासोबत स्टेज शोसुद्धा करते. तिला शास्त्रीय नृत्याव्यतिरीक्त फॅशन डिझायनिंगची आवड आहे.

Story img Loader