अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवी धुमाळ हे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. हेमांगी लवकरच ‘तमाशा Live’ या चित्रपटात दिसणार आहे. हेमांगी अनेकदा सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. हेमांगी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती नेहमी तिचे अनेक फोटो आणि धमाल व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. हेमांगीने नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली असून तिच्या आयुष्यातला ‘तमाशा Live’ सांगितला आहे.
आणखी वाचा : “अब आएगा मजा…”, मेट्रो कारशेडवरून सुमीत राघवनची पोस्ट चर्चेत
हेमांगीने तिच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हेमांगीने चित्रपटातील तिचं पोस्टर शेअर केलं आहे. हे पोस्टर शेअर करत “माझ्या आयुष्यातला ‘तमाशा Live’. माझ्या खूप व्हायरल झालेल्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ पोस्टला आज वर्ष पूर्ण होतंय आणि मला त्याचा अभिमान आहे. काही लोकं आजही त्याची खिल्ली उडवत मला आठवण करून देतायेत. टॅग करतात, ते खिल्ली उडवणारच कारण त्यांना त्यातलं गांभीर्य कळलं नाही आणि ते कधी कळणार ही नाही किंवा त्यांना मुद्दाम कळून घ्यायचं नाही, पण अनेक लोक या ट्रोलर्सला एवढेच किंबहुना जास्तच म्हणेन मी खूप समजूतदार, संवेदनशील लोकांनी मला पाठिंबा दिला आणि माझ्याशी जोडले गेले”, असे हेमांगी कॅप्शनमध्ये म्हणाली.
आणखी वाचा : व्हिडीओ मलायकाचा, पण मागच्या काकांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; पाहा व्हिडीओ
पाहा हेमांगीची पोस्ट
आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली…
पुढे हेमांगी म्हणाली, “खूप मुलींच्या, स्त्रियांच्या मनातल्या कुचंबनेला वाच्या फुटली. माझ्यासाठी हेच महत्वाचं होतं कारण माझा हेतूच तो होता. काही तरी वादग्रस्त, खळबळजनक बोलून मला कुठलाही पब्लिसिटी स्टंट वगैरे करायचा नव्हता. मला माझ्या देशाने व्यक्त व्हायचा अधिकारी दिलाय आणि मला ज्या गोष्टीचा समाजात वावरताना जर त्रास होत असेल तर तो मी बोलून दाखवणार. तसाच व्यक्त व्हायचा अधिकार काही ट्रोलर्सने घेतला आणि वाट्टेल ते थराला जाऊन ट्रोल केलं. अजूनही करतात. ते बरोबर की चूक, योग्य की अयोग्य मला माहीत नाही. बस समाज आणि माणूस म्हणून आपण कोण आहोत याची ओळख झाली.”
आणखी वाचा : राजकारणातील या जय-वीरूच्या जोडीला ओळखलं का? भरत दाभोळकरांच्या पोस्टची चर्चा
पुढे त्या पोस्टविषयी आणखी सांगताना हेमांगी म्हणाली, “मित्र परिवाराने साथ सोडली, काहींनी unfollow केलं, काहींनी लांब राहणं योग्य समजलं. अनेक हितचिंतकांचे फोन आले. काही पाठिंबा देणारे तर काही भीती दाखवणारे. ‘आता तुझं करिअर धोक्यात येणार, तुला कुणीही काम देणार नाही, तूझी image आता दूषित झाली, प्रेक्षक तुला कधीच स्वीकारणार नाहीत वगैरे वगैरे! मला त्यांना एवढंच सांगायचंय प्रेक्षक म्हणून तुम्ही माझं करिअर हिरावून घेऊ शकता माझं जगणं नाही!”
आणखी वाचा : “आधी ताई म्हणाला आणि नंतर…”, ४८ वर्षांच्या अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव
पुढे हेमांगी म्हणाली, “मी त्यांच्या या बोलण्यामुळे घाबरले नाही पण वाईट नक्कीच वाटलं होतं. मनात आलं खरंच असं घडलं तर आपण दुसरा मार्ग धरू. दुसरं काहीतरी चांगलं काम करू, पण तसं काही करायची वेळ आली नाही कारण जुलै महिन्याच्या शेवटी संजय दादांचा ‘तमाशा Live’ साठी फोन आला आणि दीड दोन महिन्यांचं वर्क शॉपकरून सिनेमा शूट सुद्धा केला आणि आज तो प्रदर्शित होतोय!”
आणखी वाचा : ‘कॉफी विथ करण’चा एका एपिसोडसाठी करण जोहर घेतो इतके कोटी, रक्कम ऐकून व्हाल थक्क
पुढे दिग्दर्शक संजय जाधव विषयी बोलताना हेमांगी म्हणाली, “दादा, या सगळ्या घटनेनंतर ही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात! लोकांनी दाखवलेली भीती खोटी ठरवलीत यासाठी मी कायम ऋणी राहीन! हा सिनेमा तर माझ्यासाठी महत्वाचा आहेच पण मला माझ्यातला आत्मविश्वास जागवण्याची संधी दिलीत त्यासाठी खूप खूप प्रेम आणि आभार. मागच्या वर्षी ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ मुळे मी ब्रेकिंग न्यूजच्या भोवऱ्यात आले होते आज ‘तमाशा Live’ मुळे बातम्यांच्या वलयात आहे. माझ्या पोस्टची anniversary मी अश्या पद्धतीने साजरी करेन वाटलं नव्हतं! आज चित्रपट प्रदर्शित होतोय खरा पण माझ्या आयुष्यात माझा ‘तमाशा Live’ मागच्या वर्षी याच दिवशी सुरू झाला होता!”