सोशल मीडियावर बिनधास्तपणे व्यक्त होणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. एखादा सामाजिक विषय असो किंवा खासगी आयुष्यामधील एखादा प्रसंग असो हेमांगी याबाबत अगदी खुलेपणाने बोलताना दिसते. सोशल मीडियावर कायमच सक्रिय असणारी ही अभिनेत्री फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. आता तिने नुकताच तिचा एक फोटो सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे.
हेमांगीने पतीबरोबचा फोटो शेअर केला आहे. त्यांच्या लग्नाला १४ वर्ष पूर्ण झाली आहेत त्या संदर्भात ही पोस्ट आहे. ज्यात ती असं म्हणते, तुम्हाला आमच्या माणसाला हसताना पाहायचं होत ना? तर बघा… आज आमच्या लग्नाला १४ वर्ष झाली तरी तो अजून हसू शकतोय यांचं श्रेय अर्थात कुणाला जातंय हे तुम्हाला सांगायची गरज नाही मला वाटत, अशा शब्दात तिने कॅप्शन दिला आहे.
“प्रेम सर्वात….” तुनिषा शर्माच्या ‘त्या’ टॅटूची सोशल मीडियावर चर्चा
हेमांगी आता आपल्याला एका नव्या रूपात दिसणार आहे. चित्रपट वेब सीरिजनंतर आता ती नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. थँक्स डियर असं नाटकाचं नाव असून मराठीतील हरहुन्नरी कलाकार निखिल रत्नपारखी याने नाटकाचे लेखन दिग्दर्शन केलं आहे.
दिग्दर्शक रवी जाधव यांच्या आगामी ‘ताली’ या वेबसीरिजमध्ये ती काम करत आहे. या वेबसीरिजमध्ये सुश्मिता सेन मुख्य भूमिकेत आहे. हेमांगी नुकतीच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात झळकली होती.