मराठी अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. ती देशातील राजकीय आणि सामाजिक अशा बऱ्याच मुद्द्यांवर आपलं मत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसते. अनेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होताना दिसतात. आताही काहीसं असंच घडलंय. नुकतीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हेमांगीनं केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे.

आज देशभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अशात हेमांगी कवीनं तिच्या फेसबुक पेजवर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत. आंबेडकर जयंतीनिमित्त पोस्ट शेअर करताना हेमांगीनं लिहिलं, ‘मानवी हक्क आणि समाजहितासाठी संविधानात तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अमलात आणायची आमचीच लायकी नाही! जमलं तर माफ करा बाबासाहेब! #जयभीम #jaybhim #डॉबाबासाहेबआंबेडकर #DrBabasahebAmbedkar #महामानव’

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
Rohit Pawar angry on Fadnavis Govt as after 35 days Santosh Deshmukh killers not punished Brother Dhananjay protesting
“न्याय देणारी व्यवस्था आरोपीला वाचवण्यासाठी…”, धनंजय देशमुखांच्या आंदोलनानंतर रोहित पवारांचा सरकारवर संताप
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?

आणखी वाचा- Bhool Bhulaiyaa 2 Teaser : ‘भूलभुलैय्या २’चा टीझर प्रदर्शित, कार्तिक आर्यनचा लुक चर्चेत

हेमांगी कवीची ही फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकांनी तिच्या या पोस्टवर कमेंट करत आपली मतं मांडली आहेत. तसं पाहायला गेलं तर एखाद्या विषयावर परखड मत व्यक्त करण्याची हेमांगी कवीची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही तिनं काही विषयांवर अतिशय परखड मत व्यक्त केलं होतं आणि त्यामुळे काही लोकांनी तिच्यावर टीका देखील केली होती.

आणखी वाचा- Video : आलिया सर्वांसमोर रणबीरसोबत असं वागली की सगळीकडे झाली होती चर्चा

हेमांगी कवीच्या कामाबद्दल बोलायचं तर ती लवकरच ‘भारत माझा देश आहे’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. याशिवाय सध्या ती कर्लस मराठी वाहिनीवरील ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे. तिनं या मालिकेत साकारलेली ‘दुर्गा’च्या आईची भूमिका देखील चांगलीच चर्चेत आहे.

Story img Loader