अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवी (Hemangi Kavi) हे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. हेमांगी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतीच हेमांगीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून अभिनेता प्रसाद ओकचे कौतूक केले आहे.
हेमांगीने तिच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये धर्मवीरचा पोस्टर शेअर करत हेमांगी म्हणाली, “दादर हुन येताना माहीमच्या signal वरून western express highway साठी right मारला आणि डावीकडे हे डोळे दिपवणारं एका मराठी चित्रपटाचं भलं मोठ्ठं पोस्टर पाहिलं आणि खरं सांगू अंगात एक चेतना निर्माण झाली. पहिल्यांदा जेव्हा सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल कळलं तेव्हा वाटलं आता काय, आणखी एक बायोपिक? तेव्हा हा चित्रपट कुणावर आहे काहीच माहीत नव्हतं. मग काही दिवसांनी एक टीझर प्रदर्शित झाला आणि साला काळजात धस्स झालं (चांगल्या अर्थाने).”
आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?
पुढे हेमांगी म्हणाली, “Slow motion मध्ये चालत आलेला एक चेहरा पाहिला! आणि मनात आलं….. कसं? हे कसं शक्य आहे. ते परत आले की काय!!! मला अक्षरशः काही मिनिटं लागली भानावर यायला! इतकं साम्य? Hats off त्या make up artist आणि look designer ला. बरं जो कलाकार या महान व्यक्तीची भूमिका साकारणार आहे त्याबद्दल तर जितकं बोलू तितकं कमी पडेल! तुम्ही make up आणि कपडे आणि केस करून same to same दिसायचा प्रयत्न कराल…. यशस्वी व्हाल… अरे पण त्या ‘भेदक’ नजरेचं काय कराल? ते कुठून आणलंस, कसं जमवलंस मित्रा Prasad Oak ? बाप रे! तू बाप आहेस! आणि ज्यांच्या वर हा biopic आहे ते आमच्या ठाणे जिल्ह्याचे वाघ ‘आनंद दिघे साहेब’. फार कमी लोकं आहेत ज्यांना आतून, मनातून ‘साहेब’ म्हणावसं वाटतं!”
आणखी वाचा : बॉलिवूडला मी परवडणार नाही म्हणणाऱ्या महेश बाबूचे आलिशान घर पाहिलेत का?
पुढे हेमांगी आनंद दिघे यांच्या विषयी सांगताना म्हणाली, “कळव्याच्या market area मध्ये २ building च्या निमुळत्या बोळात टेंभी नाक्यावरच्या जगप्रसिद्ध भवानी मातेची मूर्ती घडवली जायची, अजून ही घडतेय! मूर्तिकार पुंडलिक शिळकर यांच्या हस्ते! त्या २ building पैकी एका मध्ये मी राहायचे. गणपती विसर्जन झाल्यावर तिसऱ्या दिवशी ज्या पाटावर देवीची मूर्ती घडवणार त्याची पूजा केली जायची. घटस्थापनेच्या दिवशी कळवा ते टेंभी नाका या देवीची ज्या grand पद्धतीने मिरवणूक निघायची ना ती जगात कुठे कुणी पाहिली नसेल! इतकी भव्य आणि राजेशाही. ‘अबब’ गर्दी कश्याला म्हणतात हे मला तेव्हा कळलं आणि त्या गर्दीतून दू. 12 1 च्या सुमारास आवाज यायला सुरुवात व्हायची… ‘दिघे साहेब आले दिघे साहेब आले’. मला जसं समजतंय तेव्हापासून मी ही मिरवणूक पाहत आलीये, हे नाव ऐकत आलेय आणि हा भेदक नजरेचा प्रसन्न चेहेरा पाहत आलेय. दिघे साहेबांची अंगकाठी फारच लहान होती पण त्याचं वलय १०० आडदांड माणसांचं ही कमी पडेल इतकं भारी आणि जादू करणारं होतं! आपल्या डोळ्यात न सामावणारं आणि ही अजिबात अतिशयोक्ती नाही.”
आणखी वाचा : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट वादावर रणवीर सिंगचे वक्तव्य चर्चेत, म्हणाला…
पुढे हेमांगी दिघे साहेबांच कौतूक करत म्हणाली, “जगाच्या पाठीवर कुठलीच स्त्री तितकी सुरक्षित नसेल जितकी ती दिघे साहेबांच्या ठाण्यात होती आणि आता त्यांचेच शिष्य मा. श्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात आहे. आदर युक्त भीती आणि आदर युक्त वचक या दोन गोष्टींची मी स्वतः साक्षीदार आहे. रात्री बेरात्री कुठल्या ही धर्माची, जातीची, वयाची स्त्री न भीता निर्धास्तपणे राहू शकते, प्रवास करू शकते, जगू शकते ते फक्त आणि फक्त ‘दिघे साहेबां’च्या त्यांच्या style च्या कडक कायदा, सुव्यवस्थे आणि त्यांच्या दराऱ्यामुळेच! माझ्या वाढत्या वयात माझी सुरक्षितता महत्वाची होती आणि त्याचं रक्षण करणारी व्यक्ती तितकीच महत्वाची आणि जवळची आहे मला. दिघे साहेब गेले असं ज्या दिवशी सांगण्यात आलं तो रविवार होता आणि त्यादिवशी माझा वाढदिवस होता! 26 August! मी कॉलेजच्या चौथ्या वर्षाला होते. अख्खं ठाणं जळत होतं. कुणालाच मान्य नव्हतं त्यांचं जाणं! कळव्यात किती तरी दिवस जीव घेणारी शांतता पसरली होती.”
आणखी वाचा : महिन्याला लाखो रुपये कमवणाऱ्या ‘या’ फेमस Youtubers चे शिक्षण किती आहे माहित आहे का?
पुढे हेमांगी म्हणाली,”२००१ चा घटस्थापनेचा दिवस मला अजून आठवतोय…त्यावर्षीची ती मिरवणूक इतकी भकास आणि मनाला चटका लावून जाणारी होती काय सांगू… त्यानंतरच्या कित्येक वर्षांच्या मिरवणुका फिक्याच गेल्या. ‘जय भवानी जय शिवाजी’ अश्या मोठ्या आवाजात घोषणा देणाऱ्या दिघे साहेबांचे दरवर्षी न चुकता होणारे दर्शन आता यापुढे कधीच होणार नाही या fact मुळे आम्ही सगळे ढसा ढसा रडत होतो! तुम्हांला खोटं वाटेल पण त्यावर्षी दगडाच्या मूर्तीच्या डोळ्यात ही पाजर फुटलेला मी पाहिलाय! मी देव भोळी नाही. अश्या गोष्टींना माझा मुळीच पाठिंबा नाही…पण जे माझ्या डोळ्यांनी पाहिलं तेच प्रामाणिकपणे सांगतेय. मी आजपर्यंत प्रत्यक्षात कधीच जंगलातला वाघ पहिला नाहीए पण मी मुंबई आणि ठाणे या माणसांच्या जंगलातले २ खरे वाघ पाहिलेत…एक मा. श्री. बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे मा. श्री आनंद दिघे साहेब! प्रवीण विठ्ठल तरडे (Pravin Vitthal Tarde) , मंगेशी कुलकर्णी Mangesh Kulkarni आणि मंगेश देसाई (Mangesh J Desai) तुम्हां तिघांचे खूप खूप आभार आणि… खूप खूप शुभेच्छा! कधी एकदा हा सिनेमा बघतेय असं झालंय!”