दरवर्षी वट पौर्णिमेच्या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात. यावर्षी आज १४ जून रोजी मंगळवारी वट पौर्णिमेचा उपवास ठेवण्यात येणार आहे. या निमित्ताने सगळ्यात महिला पूजेचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. वट पौर्णिमेसाठी अभिनेत्री हेमांगी कवीने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : २४ वर्षे बेपत्ता असलेल्या अभिनेत्याच्या पत्नीने केलं दुसरं लग्न, मुलगी करते आता हे काम
हेमांगीने तिच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हेमांगी लाल रंगाची साडी नेसली आहे. हे फोटो शेअर करत “साता जन्माच्या गोष्टी! नवऱ्यासाठी निर्जळी उपवास करण्यापेक्षा त्याच्या नाकी नऊ न आणणं हे जास्त महत्वाचं आणि फलदायी व्रत आहे कुठल्याही बायकोसाठी! वडाची फांदी तोडून घरी आणून पुजण्यापेक्षा किंवा वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्यापेक्षा आपल्या नवऱ्याच्या नावाचं झाड प्रत्येक वर्षी लावलं तर फक्त त्याचंच नाही तर आपलं ही आयुष्य वाढेल कदाचित! काय?”, असे कॅप्शन हेमांगीने दिले आहे.
आणखी वाचा : राज ठाकरेंच्या वडिलांमुळे मोहम्मद रफी गाऊ लागले मराठी भक्तीगीते
पुढे हेमांगी म्हणाली, “त. टी. : यात कुणाच्या ही धार्मिक भावना दुखवायच्या नाहीयेत. उपवास करायची ज्याची त्याची इच्छा आणि श्रद्धा! तरीही त्यातून जर कुणी “म्याडम तुमी उपास धरला काय” विचाणाऱ्यांना वाळलेला फणस मिळो!” हेमांगीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. हेमांगी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.