मराठी अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. ती देशातील राजकीय आणि सामाजिक अशा बऱ्याच मुद्द्यांवर आपलं मत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसते. अनेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होताना दिसतात. आताही काहीसं असंच घडलंय. नुकतीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हेमांगीनं केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे.

आज देशभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अशात हेमांगी कवीनं तिच्या फेसबुक पेजवर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत. आंबेडकर जयंतीनिमित्त पोस्ट शेअर करताना हेमांगीनं लिहिलं, ‘मानवी हक्क आणि समाजहितासाठी संविधानात तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अमलात आणायची आमचीच लायकी नाही! जमलं तर माफ करा बाबासाहेब! #जयभीम #jaybhim #डॉबाबासाहेबआंबेडकर #DrBabasahebAmbedkar #महामानव’

Rahul Gandhi Criticized Mohan Bhagwat
Rahul Gandhi :”…तर मोहन भागवतांना अटक झाली असती”, राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Video Viral poster
Video Viral : “बायकोला तिळगूळ देणे ही अंधश्रद्धा!”, हातात पोस्टर घेऊन रस्त्यावर उभा राहिला तरुण, नेटकरी, म्हणे, “भावा…”
Nagpur 3 idiot latest news in marathi,
नागपूर : ‘थ्री इडियट’ फेम सोनम वांगचुक म्हणाले, “विकास करतोय याचा अहंकार नको…”
Shocking Viral Video Scooter rider drag a man for 1 km
बाईकस्वाराने भररस्त्यात ओलांडली क्रूरतेची मर्यादा! वृद्धाला स्कुटीला बांधत फरपटत नेलं अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
mother shouts at the Pet Dog
आई अशीच ओरडते ना? घरभर केस पडलेले पाहून श्वानाला ओरडली अन्… ; VIDEO पाहून येईल हसू
Ajit Pawar and Suresh Dhas
Ajit Pawar : सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी कोण? विचारताच अजित पवार संतापून म्हणाले, “असल्या फाल्तू…”
Tirupati stampede
Tirupati stampede : तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू

आणखी वाचा- Video : आलिया सर्वांसमोर रणबीरसोबत असं वागली की सगळीकडे झाली होती चर्चा

हेमांगी कवीची ही फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकांनी तिच्या या पोस्टवर कमेंट करत आपली मतं मांडली आहेत. तिच्या चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करताना तिला आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहे. मात्र एका युजरनं तिला या पोस्टवरून ट्रोलही करण्याचा प्रयत्न केला. ज्याला हेमांगीनं सडेतोड उत्तरही दिलं आहे.

आणखी वाचा- “जमलं तर माफ करा बाबासाहेब…”, अभिनेत्री हेमांगी कवीची फेसबुक पोस्ट चर्चेत

हेमांगी कवीच्या या पोस्टवर कमेंट करताना एका युजरनं लिहिलं, ‘तू कमी पडतियेस तर तू आत्मक्लेश कर, बाबासाहेब जगणारे आणि फक्त अटेंशन सेंट्रिक म्हणून बाबासाहेब मानणारे या दोन वृत्ती मध्ये खूप फरक आहे हिमांगी. जमलं तर बाबासाहेब जगून बघ, कुठलाही प्रमाणभाषेतला माई का लाल तुला ट्रोल करणार नाही. जयभीम’ यावर उत्तर देताना हेमांगीनं लिहिलं, ‘खूप महत्वाच्या गोष्टी कळायला ही वेळ लागतो पण जेव्हा कळतात त्यासाठी ग्रेटफुल राहणं चुकीचं आहे? आणि जे आपल्याला कळलं ते इतरांना कळायला आपल्या सारखाच वेळ लागतोय याची खंत आहे मनात! आणि ट्रोलिंगचं म्हणाल तर त्याला कोणतेही नियम, धरबंध नाहीत.’

आणखी वाचा- “सासरी करीनासोबत बसून जेवण करणंही कठीण…” कुणाल खेमूनं सांगितला अनुभव

आपल्या आणखी एका कमेंटमध्ये हेमांगी लिहिते, ‘कुठल्याही राजकीय, कलाकार लोकांनी मनापासून काही लिहिलं की ते लक्ष वेधून घेण्यासाठीच असतं असं नसतं. कधी कधी सोशल मीडियावरच्या काही लाइक्स आणि कमेंट्सच्या हव्यासासाठी नसतं. आणि हा कधी कधी मधला जो फरक आहे ना तो महत्वाचा आहे. माझ्या मित्र यादीतल्या एका जरी माणसावर मी लिहिलेल्या गोष्टीने फरक पडला तरी खूप आहे. माझ्यावर सुद्धा असंच कुणा कुणाचं वाचून, पाहून परिणाम झाला. प्रत्येक वेळी जजमेंटल होणं योग्य नाही! जय भीम’

तसं पाहायला गेलं तर एखाद्या विषयावर परखड मत व्यक्त करण्याची हेमांगी कवीची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही तिनं काही विषयांवर अतिशय परखड मत व्यक्त केलं होतं आणि त्यामुळे काही लोकांनी तिच्यावर टीका देखील केली होती. पण यावेळी तिनं ज्याप्रकारे आपली बाजू मांडत टीकाकारांना उत्तर दिलंय त्याचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

Story img Loader