मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने तिच्या दमदार अभिनयाने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आणि टेलिव्हिजन विश्वात प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. एवढचं नव्हे तर हेमांगी सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असून समाजिक मुद्दे मांडणं असो किंवा नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर देणं यात ती कधीही मागे हटत नाही. नुकतच हेमांगीला एका व्हिडीओमुळे ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत हेमांगीने या नेटकऱ्यांची बोलती बंद केली होती.

स्त्रींयांना त्यांच्या कपड्यांवरून तसचं अंर्तवस्त्रांवरुन ट्रोल करणाऱ्यांना हेमांगीने चांगलचं सुनावलं होतं. त्यानंतर हेमांगीने फेसबुकवरदेखील एक पोस्ट शेअर करत समाजात स्त्रीयांवर कपड्यामुळे असणाऱ्या बंधनांच्या प्रश्नावर वाचा फोडली आहे. स्त्रीयांना त्यांच्याच शारिरीक स्वातंत्र्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षावर हेमांगीने तिचं बेधडक मत मांडलं आहे. हेमांगीच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी तिला पाठिंबा दिला आहे.

Milind Gawali
“कलाकारांनी एकतर लग्नच करू नये…”, मिलिंद गवळी असं का म्हणाले?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Society confronts reality Water cut for six days
समाज वास्तवाला भिडताना : सहा दिवस पाणी बंद…
mamta kulkarni first post after being expelled from kinnar akhara
किन्नर आखाड्यातून हकालपट्टी झाल्यावर ममता कुलकर्णीने केली पहिली पोस्ट
Loksatta viva Fashion and Statement Influencers Presidential Inauguration
फॅशन आणि ‘स्टेटमेंट’
marathi singer vaishali samant
“मराठी कलाकारांना PF नाही, पेन्शन नाही…”, वैशाली सामंतने खंत व्यक्त करत केली ‘ही’ मागणी, म्हणाली…
Siddhivinayak Temple News
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू, तोकडे कपडे घातल्यास प्रवेश बंदी; ‘अशी’ आहे नियमावली
devmanus fame madhuri pawar shares old shocking incident
“माझ्या खांद्यावर हात टाकला…”, ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ जुना प्रसंग, स्त्रियांच्या सुरक्षेबाबत म्हणाली…

हे देखील वाचा: “मी घरात, बाहेर अंर्तवस्त्र घालायचं की नाही हा माझा प्रश्न”, हेमांगी कवीचं सडेतोड उत्तर

“बाई, बुब्स आणि ब्रा” या शिर्षकाखाली तिने ही पोस्ट शेअर केलीय. यात ती म्हणाली, “ब्रा, ब्रेसीयर (अंतर्वस्त्रा)चा चार लोकांसमोर किंवा सोशल मीडियावर तरी येताना वापरण्याचा, न वापरण्याचा, अश्लीलतेचा, त्या स्त्रीच्या संस्कारांचा, बुद्धिमत्तेचा आणि तिच्या प्रतिमेचा जो काही संबंध जोडला जातो त्यासाठी स्त्रियांना त्यांच्याच शारीरिक स्वातंत्र्यासाठी अजून किती संघर्ष करायचाय हे लक्षात येतं! आणि गंमत म्हणजे या चर्चा करणाऱ्यांंमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त अग्रेसर असतात. पुरुष निदान त्याची मजा घेऊन गप्प बसतात पण स्त्रिया स्वतः त्यातून जात असताना ही खालच्या स्तराला जाऊन चर्चा करून कुठलं पदक मिळवतात कुणास ठाऊक!”

हे देखील वाचा: “लोकांना बिकिनीतील फोटो चालतो, स्तनपानाचा फोटो टाकला तर केवढा ड्रामा”; ट्रोलर्सना अभिनेत्रीचं उत्तर

प्रविण तरडेंनी दिला हेमांगीला पाठिंबा

पुढे हेमांगीने समाजात वावरताना मुलींना किंवा स्त्रीयांना त्यांच्या अंर्तवस्त्रामुळे येणाऱ्या बंधनावर तिचं मत पाडंलं आहे. हेमांगीच्या या बेधडक पोस्टवर दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी तिचं कौतुक केलंय. ते म्हणाले, “विचार म्हणुन खतरनाक ऽऽऽऽ..खन म्हणुन वरचा दर्जा …साहित्य म्हणून कालातीत ..तू लढ हेमांगी.”असं म्हणत प्रविण तरडेंनी त्यांच्या हटके स्टाइलने हेमांगीला पाठिंबा दिला आहे. तर अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शका रसिका आगाशेने देखील हेमांगीचं कौतुक केलंय.”लव्ह यू मुली, ब्रालेस असण्याचा आनंद आहे.” असं रसिका म्हणाली.

hemangi-kavi- fb-post
(Photo-facebook/Hemangi Kavi-Dhumal)

तर हेमांगीच्या या पोस्टवर कमेंट करत अभिनेत्री वीणा जामकरनेदेखील हेमांगीला पाठिंबा दिलाय. “क्या बात हेमांगी..सॉलिड , लय भारी … वाचून सुद्धा हायसं वाटलं गं …” असं वीणा म्हणालीय.

कलाकारांसोबतच अनेक नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी हेमांगीचं कौतुक करत तिने मांडलेल्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. या आधीदेखील हेमांगीने अनेक विषयांवर आपलं मत मांडलं आहे.  नुकतच हेमांगीने ‘सारेगम लिट्ल चॅम्पस्’ या कार्यक्रमातील पंचरत्नांवर होणाऱ्या टीकेवर परखड मत मांडलं होतं.

Story img Loader