पावसाळा सुरु झाला की सगळेकडे रस्ते खराब होतात. त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचते आणि वाहन चालकाला अंदाज ही येत नाही की हा खड्डा किती खोल आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा अपघात होतात. अपघाताचे प्रमाणे वाढल्याने स्थानिक लोक प्रशासनावर नाव ठेवत असतात. मात्र, अभिनेता हेमंत ढोमेने प्रशासनावर नाही तर कॅान्ट्रॅक्टर लोकांवर निशाना साधला आहे.
हेमंत ढोमेने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर करत हे ट्वीट केले आहे. रस्त्यावर असलेल्या खड्यांचा फोटो शेअर करत ‘अतिशय प्रामाणिकपणे सांगतो… पंतप्रधान, मुख्यमंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक सग्गळे नंतर! खरे ‘कॅान्ट्रॅक्टर’! रस्ते बनवण्यात जी हातसफाई त्यांना जमते ना, कमाल! त्यांना कोणी बदलू शकत नाही!ते भारी आहेत! सगळ्यांना रस्त्याला लावतात! पुढचा जन्म रस्ते कॅान्ट्रॅक्टर चा मिळुदे बाबा!’, असे ट्वीट हेमंतने केले आहे.
आणखी वाचा : नागा चैतन्यच्या ‘पहिल्या पत्नी’ विषयी समांथाने केला होता खुलासा
आणखी वाचा : “पुरुषांमधील ‘हे’ ३ गुण मला आकर्षित करतात”, मलायकाने केला खुलासा
हेमंतच्या या ट्वीटवर सेलिब्रिटींपासून सर्वसामान्य लोकांनी त्यांच्या जवळपास असलेल्या रस्त्याचा फोटो शेअर करत तिथली परिस्थिती सांगितली आहे. दिग्दर्शक समीर विद्वांसने हेमंतच्या ट्वीटवर रिप्लाय देत रिक्षातून जातानाचा एक व्हिडीओ शेअर केला आणि ‘हॅ!! हे तर काहीच नाही..’, असे कॅप्शन दिले आहे. तर यावर हेमंतने मजेशीर उत्तर दिले आहे. ‘रस्तांबद्दल बोलतोय आपण तुम्ही प्लीज बोटीत बसुन पवई तलावाचे व्हिडीयो टाकु नका प्लीज! विनंती आहे…’,असे हेमंत म्हणाला.