परवीन बाबी या बॉलिवूडच्या अतिशय टॅलेंटेड आणि बोल्ड अभिनेत्री होत्या. त्यांचा जन्म ४ एप्रिल १९४९ रोजी झाला. त्यांनी १९७३ साली रिलीज झालेल्या ‘चरित्र’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. परवीन बाबी यांना आजही अमिताभ बच्चन यांची लिडिंग लेडी म्हणून आठवले जाते. ७० आणि ८० च्या दशकाच्या सुरुवातीला ‘दीवार’, ‘नमक हलाल’, ‘अमर अकबर अँथनी’ आणि ‘शान’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमधील त्यांच्या ग्लॅमरस अवतारासाठी त्या आजही ओळखल्या जातात. आज त्यांच्या जन्मदिनी जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी.
- जुलै १९७६ मध्ये टाईम मासिकाच्या पहिल्या पानावर दिसणाऱ्या परवीन या पहिल्या बॉलिवूड स्टार होत्या. त्या बॉलिवूडच्या पहिला महिला सुपरस्टार देखील होत्या.
Investment करण्याचा विचार करत आहात? जाणून घ्या, कशी आणि कुठून सुरु करावी पहिली गुंतवणूक
- परवीन यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक पुरुष सुपरस्टार्ससोबत काम केले होते. अमिताभ आणि परवीन यांनी आठ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
- कबीर बेदी यांच्या पत्नी प्रोतिमा बेदी यांनी त्यांच्या जीवनावर एक पुस्तक लिहिले आहे.
- परवीन आपल्या करिअरच्या बाबतीत अत्यंत सावध होत्या. त्या स्वतःच्या बळावर आपले जीवन जगत होत्या त्याचबरोबर त्या अत्यंत स्वावलंबी होत्या. त्यांना इतरांच्या कामात ढवळाढवळ करणे पसंत नव्हते.
- परवीन बाबी यांची प्रतिमा, त्या काळच्या साडी परिधान करणाऱ्या अभिनेत्रींनपेक्षा खूपच वेगळी होती. त्या खऱ्या अर्थाने ट्रेंडसेटर होत्या.
- १९७६ ते १९८० दरम्यान, रीना रॉय यांच्यासह परवीन बाबी या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या दुसऱ्या बॉलिवूड अभिनेत्री होत्या.
उन्हाळ्यातील त्वचेच्या समस्यांमुळे चिंतेत आहात? ‘या’ टिप्सचा वापर करून करा स्वतःचे रक्षण
- हेमा मालिनी, रेखा, झीनत अमान, जया भादुरी, रीना रॉय आणि राखी यांच्यासह परवीन यांना त्यांच्या काळातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक मानले जाते.
- परवीन बाबी यांची लोकप्रियता इतकी वाढली होती की निर्माते त्यांच्या नवीन प्रोजेक्ट्ससाठी परवीन यांना साईन करण्यासाठी त्यांच्या दाराबाहेर रांगा लावायचे.
- परवीन बाबी या पाश्चिमात्य संस्कृतीच्या जवळ जाणाऱ्या वाटत असल्याने त्यांना त्यांच्या ग्लॅमरस व्यक्तिमत्त्वाला अनुसरूनच भूमिका मिळाल्या.
- परवीन बाबी यांनी बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. त्या काळी परवीन तरुणांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय होत्या, ज्यामुळे त्या बॉलिवूडमधील सर्वाधिक मागणी असलेल्या अभिनेत्रींपैकी एक बनल्या. त्या प्रत्येक फिल्म मॅगझिनच्या कव्हर पेजवर असायच्या.
Photo : शरीराला थंडावा देण्यासोबतच ‘हे’ देखील आहेत काकडीचे महत्त्वाचे फायदे
- बहुतेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका करणारे डॅनी डेन्झोग्पा आणि परवीन बाबी जवळपास ४ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. नंतर दोघांचे ब्रेकअप झाले.
- डॅनीसोबत वेगळे झाल्यानंतर परवीन बाबी आणि कबीर बेदी जवळ आले. हे नातेही काही खास चालले नाही आणि दोघेही वेगळे झाले.
- कबीर बेदीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर परवीन बाबी यांना विवाहित महेश भट्ट आवडू लागले. पण सिगारेट, दारूमुळे त्या खूप आजारी पडू लागल्या. त्यामुळे महेश भट्टही त्यांना सोडून गेले.
- परवीन बाबी २२ जानेवारी २००५ रोजी त्यांच्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या होत्या.