तगड्या कलाकारांचा भरणा असलेला बहुचर्चित ‘कलंक’ हा चित्रपट बुधवारी प्रदर्शित झाला. आलिया भट्ट, वरुण धवन, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर अशी कलाकारांची फौज या चित्रपटात होती. धर्मा प्रॉडक्शन्सच्या या बिग बजेट चित्रपटाकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा होत्या. पण या अपेक्षा पूर्ण करण्यात ‘कलंक’ यशस्वी ठरला नाही. प्रेक्षक-समीक्षकांकडून या चित्रपटाला संमीश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तर सोशल मीडियावर अनेकांनी त्यावर भन्नाट मीम्स पोस्ट केले आहेत.

अभिषेक वर्मन दिग्दर्शित हा चित्रपट काहींना उगाचच ताणल्यासारखा वाटला. तर दमदार कलाकार असूनही प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडण्यात तो अयशस्वी ठरला असं मत काहींनी मांडलं. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने या चित्रपटाला ‘निराशाजनक’ म्हटलंय.

https://twitter.com/JaySalia997/status/1118478567300452352

‘कलंक’ या चित्रपटात फाळणीपूर्वीचा काळ साकारण्यात आला आहे. फाळणीपूर्वीचा काळ, लाहोरमधील हुस्नाबाद इथला हिंदू-मुस्लीम वाद, विवाहबाह्य संबंधातून जन्मलेला मुलगा, कर्तव्यदक्ष मुलगी आणि सून या सर्व घडामोडी एकत्र करून एक कथा सादर करण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शक अभिषेक वर्मनने केला आहे.