बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अजय देवगण ही जोडी ९० च्या दशकातील सुपरहिट जोडी म्हणून ओळखली जायची. त्या दोघांनी ‘जिगर’, ‘सुहाग’, ‘शक्तिमान’ यांसह अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. त्या दरम्यान ते दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. विशेष म्हणजे ते दोघेही लग्न करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. त्यावेळी अजय देवगण हा कपूर कुटुंबाचा जावई होणार अशा बातम्याही छापून आल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र या सर्व अफवांना करिश्मा कपूरने पूर्णविराम दिला होता. एका मुलाखतीत करिश्मा कपूरला तिच्या आणि अजय देवगणच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले होते. तू आणि अजय देवगण लवकरच लग्न करणार आहात, अशी चर्चा मीडियामध्ये सुरु आहे. हे खरं आहे का? असा प्रश्न त्यावेळी करिश्माला विचारण्यात आला होता. तेव्हा तिने यावर स्पष्टीकरण दिले.

“मी आणि अजय देवगण फक्त चांगले मित्र आहोत. अजयला माझ्याबद्दल काय वाटतं याबाबत त्याने मला कधी काहीही सांगितलेले नाही. पण मी आणि तो छान मित्र आहोत. आमच्या दोघात प्रेमसंबंध शक्य नाही”, असे करिश्मा कपूर म्हणाली होती.

यापुढे ती म्हणाली की, “मी एवढे चित्रपट केले असले तरी मी स्वत:ला अजून लहान समजते. मग मी इतक्या लग्न करेन, असे तुम्हाला कसं काय वाटू शकते. मला हे अजिबात समजलेलं नाही. तसेच हे सर्व फार मजेशीरही आहे.”

दरम्यान त्या काळात करिश्मा कपूर आणि अजय देवगण हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात होते. त्यांचा ‘जिगर’ हा चित्रपट हिट ठरला होता. त्यानंतर त्यांनी ‘हलचल’, ‘गुंडाराज’, ‘संग्राम’ या चित्रपटांमध्ये काम केले. मात्र त्यादरम्यान अजय हा रवीना टंडनला डेट करत असल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर करिश्मा कपूर आणि रवीनामध्ये मोठा वादही झाला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Here how karisma kapoor reacted to wedding rumours with ajay devgn back in 1993 nrp