दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कपल अभिनेत्री समांथा आणि नागाचैतन्य यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया पोस्टद्वारे घटस्फोट घेतल्याचे सांगितले. त्यांच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला. तसेच समांथा आणि नागाचैतन्य यांनी वेगळं होण्याचा निर्णय का घेतला? या मागचे कारणही अद्याप समोर आलेले नाही. लग्नाच्या जवळपास चार वर्षांनंतर ते विभक्त झाले. दरम्यान, समांथाला नागाचैतन्य आणि त्याच्या कुटुंबियांकडून तब्बल २०० कोटी रुपयांची पोटगी ऑफर करण्यात आल्याचे वृत्त आले होते. पण समांथाने ती रक्कम घेण्यास नकार दिला.

समांथाने पोटगीची रक्कम का नाकारली असा प्रश्न अनेकांना पडला होता. समांथा ही मॉर्डन विचारांची आहे आणि यशस्वी अभिनेत्री देखील आहे. तिचे वार्षिक उत्पन्न ८४ कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. ती एका चित्रपटासाठी ३ कोटी रुपये मानधन घेते. तिचा स्वत:चा कपड्यांचा एक ब्रँड आहे. त्यामुळे समांथाने बराच विचार केल्यानंतर पोटगीला नकार दिला असून नागा चैतन्यच्या कुटुंबियांकडून एक रुपयादेखील नको असल्याचे तिने स्पष्ट केल्याचे म्हंटले जात आहे.

शमिताला ‘आंटी’ बोलणे करण कुंद्राला पडले महागात, अभिनेत्रीच्या आईने सुनावले

समांथाने तिच्या अभिनय कौशल्यावर टॉलिवूडमध्ये मोठ्या मेहनतीने आणि जिद्दीने स्वत:च स्थान निर्माण केले. त्यामुळे या घटस्फोटाच्या आधारावर तिला कोणत्याही प्रकारे पैश्यांची गरज नाही असे तिने स्पष्ट केले होते. ‘द फॅमिली मॅन २’नंतर समांथाला अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स येत असल्याचे देखील तिने सांगितले आहे.

२००९ मध्ये ‘ये माया चेसावे’ या तेलुगू चित्रपटाच्या सेटवर समांथा व नागा चैतन्यची पहिली भेट झाली. त्यावेळी नागा चैतन्य कमल हासन यांची मुलगी श्रुती हसनला डेट करत होता. तर दुसरीकडे समांथा व ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थ रिलेशनशीपमध्ये होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्यमध्ये चांगलीच मैत्री झाली.

२०१५ मध्ये ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जेव्हा हे दोघं पुन्हा भेटले तेव्हा दोघांचाही ब्रेकअप झाला होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्य एकमेकांच्या प्रेमात पडले असं म्हटलं जातं. ऑक्टोबर २०१७ मध्ये हे दोघं विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या जवळपास ४ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे.

Story img Loader