मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये तिने लिपस्टिक लावण्याला विरोध केला होता. त्यानंतर #BanLipstick हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत होता. पण तेजस्विनीने लिपस्टिकला विरोध का केला? असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता त्या मागचे कारण स्वत: तेजस्विनीने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे.
सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणाऱ्या तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत #BanLipstick नक्की काय? आहे हे सांगितले आहे. हा तिच्या आगामी वेब सीरिजच्या प्रमोशनचा भाग असल्याचे समोर आले आहे.
Video: पोपटलालने अमिताभ यांच्याकडे व्यक्त केली ‘ही’ खास इच्छा, म्हणाला ‘माझे लग्न…’
लवकरच तेजस्विनीची ‘अनुराधा’ ही वेब सीरिजी प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याच सीरिजचे पोस्टर शेअर करत तिने, “सध्या चर्चेत असलेलं #BanLipstick नक्की काय आहे? त्याचंच उत्तर यात दडलंय. ‘अनुराधा’ येतेय… लवकरच फक्त ‘प्लॅनेट मराठी’ अॅपवर!” असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे हा तिच्या आगामी वेब सीरिजचा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकंदरीत सीरिजचे पोस्टर पाहाता चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.
काय आहे नेमकं प्रकरण?
तेजस्विनी पंडित आणि सोनाली खरे या दोघींनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्यांनी ‘माझा लिपस्टिकला विरोध आहे. बॅन लिपस्टिक!’ असे म्हटले होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. पण त्या दोघींना असा व्हिडीओ शेअर करण्यामागे त्यांचा काय हेतू आहे? असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता तेजस्विनीने हा व्हिडीओ शेअर करण्यामागे कारण तिची आगामी वेब सीरिज असल्याचे सांगितले आहे.