कॉमेडीचा बादशहा कपिल शर्मा प्रेयसी गिन्नीसोबत गेल्याच आठवड्यात विवाहबंधनात अडकला. कपिलनं २४ डिसेंबरला मुंबईत बॉलिवूडसाठी रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. यात अनिल कपूरपासून ते दीपिका रणवीरसह अनेक सेलिब्रिंटीची मांदियाळी पाहायला मिळाली. या पार्टीसाठी सलीम खान, सोहिल खानदेखील आले होते मात्र या ‘खान’दानात सलमान खान मात्र अनुपस्थित होता.

सलमान कपिलच्या ‘द कपिल शर्मा शो’ची निर्मिती करत आहे. मात्र रिसेप्शन पार्टीसाठी तो मात्र गैरहजर राहिला. सुत्रांच्या माहितीनुसार सलमान ‘बिग बॉस १२’ च्या चित्रीकरणात व्यग्र होता, तसेच २४ डिसेंबरला बॉलिवूडकरांसाठी कतरिनानं ख्रिसमस पार्टीचं आयोजनही केलं होतं. या कारणासाठीच सलमान रिसेप्शनला उपस्थिती राहू शकला नाही असं समजत आहे.

तर दुसरीकडे सुनील ग्रोव्हरदेखील कपिलच्या पार्टीत अनुपस्थित होता. सुनीलनं कपिलला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा ट्विटरच्या माध्यमातून दिल्या होत्या. त्याला कपिलनं रिसेप्शन पार्टीचं आमंत्रणही दिलं होतं, मात्र कपिलच्या रिसेप्शन पार्टीसाठी उपस्थित राहण्यापेक्षा सुनीलनं सेलिब्रिटींच्या ख्रिसमस पार्टीसाठी उपस्थित राहणं पसंत केलं.
कपिल आणि सुनीलमधला वाद मिटवण्याचा प्रयत्न सलमाननं केला होता. या दोघांनी पुन्हा एकत्र यावं अशी सलमानची इच्छा होती. मात्र कपिलचा शो सुरू होण्यापूर्वीचं सुनीलनं आपला नवा कोरा कॉमेडीशो घेऊन छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं.

Story img Loader