बॉलिवूडमधील देसी गर्ल प्रियंका चोप्रा सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. प्रियंकाने नुकताच १८ जुलै रोजी आपला ३७ वा वाढदिवस मियामीमध्ये पती निक जोनास आणि जवळच्या लोकांसोबत साजरा केला. एका यॉर्टवर झालेल्या खास पार्टीमध्ये प्रियंकांचा लाल रंगाचा ड्रेस घालून आली होती. तिचा हा ड्रेस चांगलाच चर्चेचा विषय ठरला. निकने आयोजित केलेल्या या पार्टीचे आणखीन एक आकर्षण ठरले तो म्हणजे प्रियंकाच्या वाढदिवसाचा केक.
प्रियंकाच्या ड्रेसच्या रंगाप्रमाणेच लाल आणि सोनेरी रंगांचा पाच थरांचा उंच केक नीकने आणला होता. हा केक मियामीमधील एका खास बेकरीमध्ये तयार करण्यात आला होता. हा केक चॉकलेट आणि व्हॅनीला पासून बनवण्यात आल्याचे ‘डिव्हाइन डेलिकसीज केक्स’ने म्हटले आहे.
View this post on Instagram
‘पिंक विला’ या इंग्रजी वेबपोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार प्रियंकाच्या वाढदिवसासाठी नीकने आणलेला हा केक बनवण्यासाठी २४ तास लागले. या केकची किंमत ५ हजार डॉलर म्हणजे जवळवजळ ३ लाख ४५ हजार इतकी होती असं ‘पिंक विला’ने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. ‘नीकला प्रियंकाच्या बर्थ डे पार्टीच्या ड्रेसप्रमाणे लाल आणि सोनेरी रंगातील केक हवा होता. प्रियंकाला सोने रंगामधील नक्षीकाम आवडते असं नीकने सांगितले होते,’ अशी माहिती केक बनवणाऱ्या आर्टिस्टने दिली.
प्रियंकाने पती नीक, आई मधू चोप्रा आणि बहीण परिणीती चोप्राबरोबर वाढदिवस साजरा केला. दरम्यान, प्रियंका ‘स्काय इज ब्लू’ या सिनेमामधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘द टोरांटो फिल्म फेस्टीव्हल’मध्ये १३ सप्टेंबर रोजी हा सिनेमा दाखवला जाणार आहे. तर ११ ऑक्टोबर रोजी हा सिनेमा भरतामध्ये प्रदर्शित होणार आहे.