बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चक्क च्युइंग गम भेट म्हणून द्यायचा आहे. यामागचं रंजक कारण नुकतंच मनोजनं एका मुलाखतीत सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मी मोदींना कधीही भेटलो नाही. त्यांना भेटण्याची मला खूप इच्छा आहे. माझ्या मनात त्यांच्याप्रती कमालीचा आदार आहे. मी त्यांना जेव्हा केव्हा भेटेन तेव्हा मला त्यांना आवर्जून च्युइंग गम भेट म्हणून द्यायचा आहे’ असं मनोज ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणला. यामागचं कारण त्यानं सांगितलं. ‘मोदी दिवस- रात्र काम करतात त्यांचं वेळापत्रक व्यग्र असतं त्यामुळे त्यांना आराम करायला मिळत नाही. ते फक्त ४ तास झोपतात असं मी ऐकलं आहे. म्हणूनच मी त्यांना च्युइंग गम भेट म्हणून देणार आहे. जेणेकरून ते तो चघळतील आणि आराम करतील’ असं असं मनोज म्हणाला.

‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘सत्यमेव जयते’, ‘सत्या’, ‘स्पेशल २६’ यांसारख्या अनेक चित्रपटातून मनोज बायपेयी झळकला आहे. नुकताच त्याला पद्म श्री पुरस्कारही जाहीर झाला आहे.