चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता नवनवीन आयडिया सध्या बॉलीवूडमध्ये पाहावयास मिळत आहेत. सोशल मिडिया असो किंवा चाहत्यांसोबतचे सेल्फी फोटो काढणे असो बॉलीवूडकर काय काय आयडिया आणतील याचा पत्ता नाही. अशीच नवी शक्कल लढवली जातेय ती आगामी ‘फाइंडिंग फॅनी’ चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता. दीपिका पादुकोण आणि अर्जुन कपूरने नुकताच चित्रपटातील त्यांचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला होता. या चित्रपटाला अधिकाधिक प्रसिद्धी मिळावी म्हणून चित्रपटाची पूर्ण टीम आता नवीन आयडिया घेऊन आली आहे.
चित्रपटातील मुख्य जोडी आणि प्रख्यात कलाकार नसिरुद्दीन शाहा, डिंपल कपाडिया, पंकज कपूर यांनी ९ जुलैला प्रदर्शित होणा-या ‘फाइंडिंग फॅनी’चा ट्रेलर का पाहावा याची कारणे दिली आहेत. डिंपल, नसीर, अर्जुन, दीपिका आणि पंकज यांनी ट्रेलर का पाहावा याची वैयक्तिक कारणे सांगणारा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. गोव्यातील रोडट्रीपवर चित्रीत करण्यात आलेल्या या चित्रपटाची कथा लहानपणीच्या मित्रांचा शोध घेत असलेल्या पाच पात्रांवर आधारित आहे. होमी अदाजानिया दिग्दर्शित आणि सैफ अली खानच्या इल्युमिन्ती फिल्म्सची निर्मिती असलेल्या ‘फाइंडिंग फॅनी’चे चित्रीकरण ऑक्टोबर २०१३ला सुरु करण्यात आले होते. त्यानंतर केवळ ४१ दिवसांत हे चित्रीकरण पूर्ण झाले. १२ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा