Highest Grossing Indian Movie of 2024 : भारतात दरवर्षी शेकडो चित्रपटांची निर्मिती केली जाते. करोनानंतर काही चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होतात, तर काही ओटीटीवर रिलीज केले जातात. सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झालेले काही चित्रपट चांगली कमाई करण्यात यशस्वी होतात; तर, अनेक चित्रपट फ्लॉप होतात. २०२४ मध्ये अनेक बिग बजेट चित्रपट रिलीज झाले, त्यापैकी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट कोणता ते जाणून घेऊयात.

भारतात २०२४ या वर्षात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ‘स्त्री २’ नाही. श्रद्धा कपूरच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली; मात्र सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर नाग अश्विनने दिग्दर्शित केलेला पॅन इंडिया सिनेमा आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट दमदार होती, पण अनेक दाक्षिणात्य कलाकारांचे यात कॅमिओ होते.

pakistan google search indian movie 1
भारतीय चित्रपट व वेब सीरिजचं पाकिस्तानला वेड; बॉलीवूडचे ‘हे’ सिनेमे सीमेपल्याड ठरले सुपरहिट, पाहा यादी
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Pushpa 2 Movie News
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ हजार कोटींच्या क्लबमध्ये, इतकी बक्कळ कमाई करणारे आणखी सहा चित्रपट कुठले?
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
MHADA Non Residential Project MHADA 16 storey commercial complex in Pune Mumbai news
पुण्यात म्हाडाचे १६ मजली व्यावसायिक संकुल; आतापर्यंतचा म्हाडाचा सर्वात मोठा अनिवासी प्रकल्प
ED quiz actress Gehena Vasisth in financial fraud probe
अभिनेत्री गहना वशिष्ठची ईडीकडून चौकशी
Pushpa 2 Box Office Collection Day 3
Pushpa 2 : ‘पुष्पा’ने तिसऱ्या दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी! शाहरुखच्या ‘जवान’ला टाकलं मागे, आतापर्यंतची कमाई किती?
Loksatta lokrang Documentary Film Institute Director creation and thoughts that explain social consciousness
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले:  निर्मितीच्या तीन तऱ्हा

हेही वाचा – दोन अभिनेत्रींमधील किसिंग सीनमुळे वाद, दिग्दर्शकाचं करिअर संपलं; तब्बल १० कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले फक्त…

२०२४ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय सिनेमा

‘कल्की 2898 एडी’ हा २०२४ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट आहे. प्रभास, अमिताभ बच्चन व दीपिका पादुकोण यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट २७ जून रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ग्रँड ओपनिंग करून अनेक चित्रपटांच्या कमाईचे विक्रम मोडले होते. नंतर चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं व सर्वाधिक बॉक्स ऑफिस कलेक्शन करणारा भारतीय सिनेमा ठरला.

हेही वाचा – बॉलीवूड कलाकारांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट; मात्र चित्रपट ठरला सुपरफ्लॉप, कमावले फक्त…

‘कल्की 2898 एडी’चे बजेट व कलेक्शन

Kalki 2898 AD Budget & Collection: ‘कल्की 2898 एडी’ हा भारतातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक आहे. तब्बल ५५० कोटी रुपये खर्च करून या सिनेमाची निर्मिती करण्यात आली होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या चित्रपटाने जगभरात १२०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

हेही वाचा –भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा गायक; एका गाण्यासाठी आकारतो तब्बल तीन कोटी! अरिजीत सिंह, सोनू निगम जवळपासही नाहीत

‘कल्की 2898 एडी’मध्ये कलाकारांची मांदियाळी

या चित्रपटात प्रभास, बिग बी व दीपिका पादुकोण यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. अमिताभ बच्चन यांनी अश्वथामाची भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात कमल हासन, दिशा पाटनी, शोभना, एसएस राजामौली, विजय देवरकोंडा, दुल्कर सलमान यांच्यासह अनेक स्टार्स पाहुण्या भूमिकेत झळकले होते.

हेही वाचा – वडील सुपरस्टार, स्वतःही केले हिट चित्रपट; आता जग फिरतोय ‘हा’ अभिनेता, लोकांच्या शेतातही करतो काम

ओटीटीवर आहे ‘कल्की 2898 एडी’

‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट नेटफ्लिक्स व प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. हिंदी भाषेत हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहू शकता. तर तामिळ, तेलुगू व कन्नड भाषेतील चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

Story img Loader