सध्या विवेक अग्निहोत्रींचा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बराच गाजतोय. प्रेक्षकांपासून ते समीक्षक आणि राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनीच या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. बऱ्याच कलाकारांनी हा चित्रपट पाहिला असून त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र मूळची काश्मिरी असलेली टीव्ही अभिनेत्री हिना खानला जेव्हा या चित्रपटाबाबत विचारण्यात आलं तेव्हा मात्र तिनं जी प्रतिक्रिया दिली त्याचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं.
‘बॉलिवूड लाइफ’सोबत बोलताना हिना खाननं या चित्रपटावरून होत असलेल्या वादाबद्दल काहीच माहीत नसल्याचं म्हटलं आहे. या चित्रपटाबाबत अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. काहींनी तर या चित्रपट एक विशिष्ट प्रकारचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आल्याचं म्हटलंय. अभिनेत्री स्वरा भास्कर आणि गौहर खान यांनी तर या चित्रपटावर टीका देखील केली आहे. ज्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर आता हिना खानची प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे.
आणखी वाचा- “काश्मिरी पंडित पती आणि…”, The Kashmir Files साठी यामी गौतम झाली भावूक
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाबद्दल बोलताना हिना खान म्हणाली, ‘सध्या तरी मी या चित्रपटावर काहीच बोलू शकत नाही. कारण मी अद्याप हा चित्रपट पाहिलेला नाही. थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहण्याचा माझा कोणताही प्लान नाही त्यामुळे जेव्हा हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होईल तेव्हा मी नक्कीच पाहणार आहे. माझ्या भावाने हा चित्रपट पाहिला आहे आणि थिएटरमध्ये चित्रपट सुरू असताना कशाप्रकारे लोक रडत होते किंवा आपल्या भावना व्यक्त करत होते हे त्यानं मला सांगितलं. पण हा चित्रपट कोणत्या विषयावर आहे हे मला माहीत नाही. त्यासाठीच मी हा चित्रपट पाहणार आहे.’
आणखी वाचा- अपूर्ण नेमळेकरची खवय्येगिरी, बिर्यानीचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली; “पोटातून…”
दरम्यान ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारखे प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.