अभिनेत्री हिना खान कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत असते. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात प्रवेश करणारी हिना खान सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय आहे. ती कधी तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे तर कधी व्हिडीओंमुळे तिच्या चाहत्यांची मने जिंकते. अशातच आता हिना खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिने केलेलं कृत्य पाहून तिचे चाहते थक्क झाले आहेत.
हिना खानने नुकताच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती मेकअप करताना दिसत आहे. पण अचानक ती तिच्या मेकअपमॅनला थापड मारते. हिनाने हा विनोदी व्हिडीओ तयार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ती मेकअपमॅनला थापड मारते. मेकअपमॅन तिच्या हातातून लिपस्टिक घेतो, यावर ती जुही चावलाचा ‘आईंदा मुझसे ऐसा मजाक किया तो मुंह दोड दुंगी’ या डायलॉगवर अॅक्टिंग करताना दिसते. हिनाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय.
पाहा व्हिडीओ –
दरम्यान, अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये हिनाने काम केलं आहे. सध्या ती तिच्या म्युझिक व्हिडिओंमुळे चर्चेत आहे.