विविध राज्यांतील लोकांनी परस्परांशी संपर्कासाठी इंग्रजीऐवजी हिंदीचा वापर करावा, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा हिंदी सक्तीचा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेला आला होता. हा एक प्रकारे हिंदी सक्तीचाच भाग असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली. तमिळनाडू, तेलंगणा इत्यादी दाक्षिणात्य राज्यांमधील सत्ताधारी आणि राजकीय नेतृत्वाकडून शहा यांच्या या प्रस्तावाला विरोध केला जात आहे. नुकतंच दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप याने यावर निशाणा साधला आहे. त्यासोबत त्याने दाक्षिणात्य चित्रपट सुपरहिट ठरण्यावर भाष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीपने नुकतंच ‘R’-The Deadliest Gangster Ever या चित्रपटाच्या लाँचिंगला हजेरी लावली. यावेळी त्याने दक्षिणेत हिंदी चित्रपट का चालत नाहीत? या सलमान खानच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. तो म्हणाला की, “दाक्षिणात्य दिग्दर्शक सध्या अशा चित्रपटांची निर्मिती करत आहे ज्याचे जागतिक स्तरावर अस्तित्व असेल. बॉलिवूडमधील अनेक दिग्दर्शक निर्माते हे तेलुगू आणि तामिळमध्ये चित्रपट डब करत आहेत. पण त्याचे प्रमाण फार कमी आहे.”

जेव्हा भुकेने व्याकूळ झालेल्या वरुण धवनसाठी दिव्या भारतीने बनवले होते ऑम्लेट, नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या

“सध्या दक्षिणेत अनेक चित्रपटांची निर्मिती होत आहे, असे तुम्ही काही वेळापूर्वी म्हणालात. पण मला त्यात एक छोटीशी दुरुस्ती करायची आहे. हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही. तर सध्या संपूर्ण सिनेसृष्टी ही विविध भाषांवर चित्रपटांची निर्मिती करताना दिसत आहे. अनेक बॉलिवूडमधील निर्माते, दिग्दर्शक तेलुगू, तामिळमध्ये चित्रपट डब करत आहेत. पण त्यांना त्यातून हवे तितके यश मिळत नाही आणि त्याउलट आज आम्ही सर्वत्र चालणारे चित्रपट बनवत आहोत”, असे दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप म्हणाला.

‘दक्षिणेत हिंदी चित्रपट का चालत नाहीत?’ सलमानच्या प्रश्नावर दाक्षिणात्य सुपरस्टारने दिले उत्तर, म्हणाला “एका रात्रीत…”

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दक्षिणेतील अनेक चित्रपट सुपरहिट ठरताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘केजीएफ: चॅप्टर टू’ हा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. ‘केजीएफ: चॅप्टर वन’ हा १९८०च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातील पीरियड ड्रामा असून एका अनाथ माणसाची कथा आहे. अप्रतिम अभिनय, सुंदर दृश्ये आणि मनोरंजक कथेच्या संगमामुळे या चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले होते. यशचा ‘केजीएफ: चॅप्टर टू’ १४ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित झाला या चित्रपटात यशसोबत संजय दत्त आणि रविना टंडन हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट तेलुगू, हिंदी, कन्नड आणि तामिळ या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindi is no more a national language said kiccha sudeep reacts to kgf 2 being called a pan india film made in kannada nrp