गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हिंदी भाषेवरून वाद सुरु असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. कन्नड अभिनेता किच्चा सुदीपनं (Kiccha Sudeep) हिंदी राष्ट्रभाषा नाही, असं म्हटल्यावर हा वाद सुरू झाला. त्यावर उत्तर देत बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) म्हणाला, हिंदी आपली राष्ट्रभाषा होती, आहे आणि राहील. त्यानंतर हा विषय सेलिब्रिटींमध्ये वादाचा भाग ठरला. आता या सगळ्यात अभिनेता जावेद जाफरीनंही (Jaaved Jaaferi) त्याचं मत मांडलं आहे.
जावेदने नुकतीच ‘इंडिया टुडे’ला मुलाखत दिली आहे. त्यावेळी हिंदी भाषेवर सुरु असलेल्या वादावत जावेद म्हणाला, “मी याबद्दल थोडं वाचलं. संविधानानुसार कोणती एक भाषा नाही, मी तेच पाहिलं. मी अधिकृत भारतीय भाषांबद्दल वाचत होतो आणि संविधान कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देत नाही. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असा माझा गैरसमज होता. पण मी आता पाहिलं की संविधान कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देत नाही.”
आणखी वाचा : एआर रहमानची लेक खतीजाचा झाला निकाह, पाहा फोटो
आणखी वाचा : एसएस राजामौली यांना मराठमोळ्या ‘धर्मवीर’ची भुरळ, टीझर पाहताच म्हणाले…
जावेद पुढे म्हणाला, “एकूण २२ अधिकृत भाषा आहेत. त्यापैकी आसामी, बंगाली, हिंदी, मराठी, गुजराती, उर्दू आणि सिंधी या सर्व अधिकृत भाषा आहेत. पण मुद्दा हा विविधतेतील एकतेचा आहे. आणि हेच या देशाचं सौंदर्य आहे. अनेक धर्म आहेत परंतु कोणताही एक राष्ट्रीय धर्म नाही. कोणतीही एक राष्ट्रीय भाषा नाही. आपल्याकडे राष्ट्रीय पक्षी किंवा राष्ट्रीय फूल आहे. सगळ्यांचं एकत्र असणं हेच देशाचं भविष्य आहे आणि मला वाटत नाही दुसऱ्या देशांमध्ये ते आहे.”
आणखी वाचा : फॅटी लिव्हर म्हणजे काय आणि ते का होते? मधुमेहाच्या रुग्णांना ‘ही’ माहिती असणे आहे आवश्यक
एका जाहीर कार्यक्रमात किच्चा सुदीप म्हणाला होता की, “हिंदी ही आता राष्ट्रीय भाषा राहिलेली नाही. बॉलिवूडमध्ये तामिळ आणि तेलगू भाषांमधील चित्रपटांचा रिमेक केला जात आहे. परंतु तरीही बॉलिवूडचा स्ट्रगल अजूनही सुरूच आहे. आज आम्ही जे चित्रपट बनवतो तेच संपूर्ण जगामध्ये पाहिले जात आहेत.”