तुम्हाला यश चोप्रा दिग्दर्शित ‘मशाल’मधील ‘होली आई रे…’ हे गाणे आठवतेय का? नसेल तर युट्यूबवर बघू शकता. चाल ओळखीची वाटते? ‘जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजती’ हे ‘जैत रे जैत’चे गाणे ऐकल्यासारखे वाटतयं ना? दोन्हीचे संगीतकार एकच. अर्थात ह्रदयनाथ मंगेशकर. अगोदर ‘जैत रे जैत’ (१९७७) आला आणि त्यानंतर सात वर्षांनी म्हणजेच १९८४ साली ‘मशाल’ आला तेव्हा काहीनी म्हटलं हे एका भाषेतील चित्रपटाची चाल अगदी जशीच्या तशी दुसऱ्या भाषेतील चित्रपटासाठी वापरणे कितपत योग्य आहे? काहीनी म्हटले की, दोन्ही चित्रपटांचे स्वरूप भिन्न असेल तर मग त्यात हरकत काय? वगैरे वगैरे ह्रदयनाथ मंगेशकर यानी ‘धनवान’ (१९८१) मधील काही गाणी आपल्याच मूळ मराठी गाण्यावरील चालीतच दिली होती. पण असे असले तरी त्यांचेच ‘मशाल’मधील किशोरकुमारने गायलेले ‘जिंदगी आ रहा हू मै’ हे ओरिजिनल गाणे जास्तच भावते. याचाच अर्थ नवनिर्मिती महत्त्वाची आहे.
BLOG : मराठी गाणे हिंदीत ‘जांभुळ पिकल्या…’ ते ‘ झिंगाट…’
मराठी चित्रपटातील गाण्याची चाल हिंदीत अथवा हिंदीतील गाणे मराठीत हे नवीन नक्कीच नाही.
Written by दिलीप ठाकूर
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-07-2018 at 11:48 IST
मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindi version of zingaat marathi movie sairat famous zingat song in hindi movie dhadak