पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याने जानेवारी महिन्यात तिसरं लग्न केलं. भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झाशी शोएबचं दुसरं लग्न झालं होतं. सानियापासून विभक्त झाल्यानंतर त्याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी तिसरं लग्न केलं होतं. सना जावेदचंही हे दुसरं लग्न आहे. शोएबच्या लग्नानंतर त्याला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. पण एका पाकिस्तानी अभिनेत्रीने शोएबची बाजू घेत केलेलं वक्तव्य आता चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानी अभिनेत्री हिरा सूमरो हिने शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नाचं समर्थन केलं आहे. एका पॉडकास्टमध्ये हिरा म्हणाली, “मला कळत नाही की शोएबने लग्न करून काय चुकीचं केलं आहे? लोक इतका गोंधळ का घालत आहेत?” त्यावर होस्ट म्हणाला, “त्याने भारतीय बायकोला सोडून दिलं, त्यामुळे लोक नाराज आहेत.”

तीन स्टार्सशी अफेअरच्या चर्चा! एकाने विवाहित असूनही दिलेली प्रेमाची कबुली; दुसरा होता भारतीय टीमचा कॅप्टन, ही अभिनेत्री अजूनही

हिरा म्हणाली, “शोएबची मर्जी. सानिया मिर्झाला सोबत ठेवूनही तो आणखी चार लग्न करू शकला असता. मला कळत नाहीये की लोकांना नेमकं कशाचं दुःख आहे. त्याने सानियाला सोडलं याचं की सनाशी लग्न केलं याचं?” यानंतर होस्ट म्हणाला की भारतीय वहिनीला सोडलं याचं लोकांना दुःख आहे. पाकिस्तानी बायको असती आणि तिला सोडून दुसरी आणली असती तर कदाचित इतकं वाईट वाटलं नसतं.

प्रियांका चोप्राची बहीण झाली केजरीवालांची सून! मीराने ४० व्या वर्षी बांधली लग्नगाठ, फोटो शेअर करत म्हणाली…

यावर हिरा म्हणाली की वहिनीने (सानिया मिर्झा) ‘खुला’ घेतला आहे. त्यावर होस्ट म्हणतो, कोणी आपल्या इच्छेने ‘खुला’ घेतं का? त्यानंतरही हिराने शोएबचंच समर्थन केलं आणि आपल्याला कुणाच्या घरात काय घडतंय या सगळ्या गोष्टी माहित नसतात. कदाचित सानिया शोएबला समजू शकली नसेल, असं म्हणाली. “आजकाल लग्न केल्यानंतरही लोकांच्या १०-१० गर्लफ्रेंड्स असतात. लग्नानंतर गर्लफ्रेंड असण्याला तर कोणतंही बंधन नाही,” असं हिरा म्हणाली.

हिरा सूमरोने केलेल्या या विधानानंतर तिला खूप ट्रोल केलं जात आहे. एक महिला असून ती एका व्यक्तीच्या तीन लग्नांचं समर्थन करतेय, अशा प्रतिक्रिया लोक देत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hira soomro reacts on shoaib malik sana javed wedding takes sania mirza name hrc