मराठी चित्रपटांना आता अच्छे दिन आले आहेत. मराठीमधील ऐतिहासिक चित्रपट तर बॉक्स ऑफिसवर कमाल करत आहेत. आता आणखी एका ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शूर मावळ्यांनी जीवाची बाजी लावत इतिहास घडवला. या मावळ्यांपैकीच निष्ठावंत मावळा म्हणजे मुरारबाजी देशपांडे. नरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा रुपेरी पडदयावर साकारण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – नाना पाटेकर यांच्या लेकाचं साधं राहणीमान, कामातही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवतोय मल्हार

‘फत्तेशिकस्त’ तसेच ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या भरघोस यशानंतर आलमंड्स क्रिएशन्स व ए.ए.फिल्म्स यांनी ‘वीर मुरारबाजी…पुरंदरची युद्धगाथा’ चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे. ऐतिहासिक चित्रपटांकडे प्रेक्षकांचा ओढा सध्या अधिक वाढला आहे.

१६६५मध्ये मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार असलेले मुरारबाजी देशपांडे निवडक सातशे मावळ्यांसह दिलेरखानाच्या फौजेवर चालून गेले. यादरम्यान नेमकं काय घडलं? मुरारबाजी यांनी मुघलांशी कशाप्रकारे दोन हात केले? हे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

आणखी वाचा – VIDEO : ऐश्वर्या व मुलगी आराध्यासमोर बेभान होऊन नाचला अभिषेक बच्चन, पत्नीलाही नवऱ्याचं कौतुक

वीर मुरारबाजी…पुरंदरची युद्धगाथा’ चित्रपटही भव्यदिव्य असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार? तसेच चित्रपटामधील कलाकारांची देखील लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. हा ऐतिहासिक चित्रपट पुढील वर्षी १७ फेब्रुवारी २०२३ चित्रपटगृहांमध्ये दाखल होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Historical marathi movie on veer murarbaji deshpande release next year kmd