मराठीमध्ये सध्या ऐतिहासिक चित्रपट येत आहेत. याच ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘पावनखिंड’. ‘पावनखिंड’ (Pawankhind) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. या चित्रपटामध्ये अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका उत्तमरित्या साकारली. या भूमिकेमुळे अजय यांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. इतिहासप्रेमी अजय यांनी नुकताच एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

आणखी वाचा – आजारी पत्नी अन् धक धक गर्लच्या प्रेमात आकंठ बुडालेला संजय दत्त, नातं उघडकीस आलं अन्…

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
daughter in law hugs mother-in-law tightly
अगंबाई…! सुनबाईंची सासूबाईंना कडकडून मिठी; VIDEO ची एकच चर्चा
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य

अजय त्यांच्या लेकीसह विशाळगडाच्या दर्शनासाठी गेले होते. यादरम्यानचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी सगळ्यांना एक आवाहन केलं आहे. ते बोलताना म्हणाले, “मी आणि माझी मुलगी सई आज (३० जुलै) विशाळगडाच्या दर्शनाला आलो आहोत. आता आम्ही नरवीर बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधीजवळ आहोत. यानिमित्ताने पावनखिंडीचंही दर्शन घडलं. महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची आज प्रकर्षाने जाणीव होतेय तसेच आठवण येत आहे. ते आज आपल्यामध्ये असते तर १०१ वर्षांचे असते.”

पाहा व्हिडीओ

पुढे बोलताना ते म्हणाले, “बाबासाहेब पुरंदरे यांनी नाटकामधून आमच्या रक्ताच्या धमन्यातून छत्रपती शिवाजी महाराज पसरवले. ते नाटक म्हणजे ‘जाणता राजा’. हे नाटक तोंड पाठ झालं होतं. तेव्हापासूनच मला शिवचरित्राची ओढ लागून राहिली होती. आज बाबासाहेबांचं कार्य मागे वळून पाहताना असं वाटतं की त्यांच्या हातून किती महान कार्य घडलेलं आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशामध्ये देखील ‘जाणता राजा’चे असंख्य प्रयोग झाले. त्यामुळेच जगभरात पसरल्या गेलेल्या मराठी माणसांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कायमचे कोरले गेले.”

आणखी वाचा – “राजकारणात विश्वासघात हा रोज होत असतो” ‘मी पुन्हा येईन’ वेबसीरिज अखेरीस प्रदर्शित

शिवप्रेमींना आवाहन करत अजय यांनी म्हटलं की, “श्री शिवराज अष्टकाद्वारे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आठ चित्रपट करत आहोत. आज एक आवाहन मला शिवभक्तांना आणि सर्व मराठी मनाच्या माणसांना करायचं आहे. ते आवाहन म्हणजे आपण असंख्य लोक दरवर्षी किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा पावनखिंडीचं दर्शन घेता. यादरम्यान इथे बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांची समाधी आहे. त्याचंही दर्शन आवश्य घ्या. या वीररत्नांचं दर्शन घेऊन तुम्हाला अधिक समाधान वाटेल. हेच आवाहन तुम्हा सगळ्यांना मी करत आहे. नक्की याचा विचार करा. पावनखिंडीचं दर्शन तसेच विशाळगडाचंही दर्शन आपल्याला घ्यायचं आहे हे लवकरात लवकर ठरवा. हरहर महादेव.” अजय यांच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून उत्तम प्रतिसाद दिला आहे.

Story img Loader