महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या दमदार चित्रपटांसोबतच त्यांच्या खासगी आयुष्यात घडलेल्या काही घटनांमुळेही बरेच चर्चेत राहिले आहेत. १९७३ साली अमिताभ यांनी जया बच्चन यांच्याशी लग्न केलं पण नंतर त्यांचं नाव प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांच्याशी जोडलं जाऊ लागलं. त्यावेळी अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. एवढंच नाही तर होळीच्या दिवशी अमिताभ यांनी पत्नी जया बच्चन यांच्यासमोर रेखा यांना रंग लावला होता.
खरं तर हा किस्सा आहे १९८१ सालचा. याच वर्षी रेखा आणि अमिताभ बच्चन यांचा ‘सिलसिला’ चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन आणि अभिनेता संजीव कुमार यांच्याही मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटात रेखा, अमिताभ आणि जया बच्चन यांचा लव्ह ट्रँगल दाखवण्यात आला होता. या चित्रपटातील ‘रंग बरसे’ हे गाणं खूपच लोकप्रिय झालं होतं.
आणखी वाचा- The Kashmir Files वर आर माधवनची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाला “मला खूप…”
‘सिलसिला’ चित्रपटात एक होळीचा सीन होता. ज्यात सर्व कलाकार होळी खेळताना, एकमेकांना रंग लावताना दिसले होते. या चित्रपटातील ‘रंग बरसे’ या गाण्यात अमिताभ बच्चन रेखा यांना रंग लावताना दिसतात. या चित्रपटात रेखा यांनी संजीव कुमार यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. तर जया यांनी अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या गाण्यात अमिताभ बच्चन रेखा यांना रंग लावताना आणि संजीवकुमार आणि जया त्यांना दूरून पाहताना दिसले होते.
आणखी वाचा- वेगळं झाल्यानंतर पहिल्यांदाच धनुषची पूर्वश्रमीच्या पत्नीसाठी खास पोस्ट, म्हणाला…
या चित्रपटात हे सर्व मजेदार अंदाजात दाखवलं असलं तरी या गाण्यामुळे जया बच्चन आणि अमिताभ यांच्या खासगी आयुष्यात मात्र वादळ उठलं होतं. रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या चर्चा एकूण जया बच्चन एकदा एवढ्या चिडल्या होत्या की रेखा यांच्या कानशीलात लगावली होती. दरम्यान ‘सिलसिला’ हा रेखा आणि अमिताभ यांच्या शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटानंतर या दोघांनी पुन्हा कधीच एकत्र काम केलं नाही.