उन्हाळी सुट्टी संपून विद्यार्थ्यांच्या शाळा आणि कॉलेजेस सुरू झाले असले, तरी काही बॉलीवूडकर मात्र अजूनही आपल्या समर व्हॅकेशनमध्ये व्यस्त आहेत.
फराह खानच्या ‘हॅपी न्यू इयर’ या आगामी चित्रपटाचे नुकतेच चित्रीकरण आटोपलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत इटली आणि स्पेनमध्ये धमाल करताना दिसली. दरम्यान, ज्या एअरलाईन्समधून दीपिकाने प्रवास केला त्यातून तिची एक बॅगही गायब झाल्याचे आपल्या ट्विटरवर म्हटले आहे.


तर, दुसरीकडे अभिनेता ह्रतिक रोशन आपल्या रेहान आणि रिदान या दोन्ही मुलांसोबत डिस्नेलँडमध्ये सुट्टीचा आनंद लुटताना दिसला. त्यातील काही महत्वाची क्षणचित्रे ह्रतिकने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली.


अभिनेत्री नेहा धुपिया देखील स्पेनमध्ये आपला ‘टाईम स्पेंड’ करताना दिसली. स्पेनमधील आपल्या सुट्टी दरम्यानची छायाचित्रे नेहाने शेअर केली आहेत.
 

Story img Loader