Hollywood Actor Christian Oliver with His 2 Daughters Killed In Plane Crash : प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता व त्याच्या दोन मुलींचे अपघाती निधन झाले आहे. जर्मन वंशाचा हॉलीवूड अभिनेता क्रिश्चियन ऑलिव्हर त्याच्या दोन लहान मुलींसह अपघातात मृत्यू पावला आहे. ते प्रवास करत असलेले छोटे विमान टेकऑफनंतर काही क्षणांतच कॅरेबियन समुद्रात कोसळले, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एनडीटीव्ही’ ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘द गुड जर्मन’ आणि ‘स्पीड रेसर’ या चित्रपटांमध्ये झळकलेला क्रिश्चियन ऑलिव्हर गुरुवारी खासगी विमानाच्या अपघातात मुलींसह मरण पावला. असे रॉयल सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स पोलीस फोर्सने एका निवेदनात म्हटले आहे. ५१ वर्षीय ऑलिव्हर, त्याच्या मुली मॅडिटा (१० वर्षे) आणि अॅनिक (१२ वर्षे) आणि पायलट रॉबर्ट सॅक्स अशी मृतांची नावे आहेत.

Video: महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट करतेय जान्हवी कपूर, प्रेमाची कबुली दिल्यानंतर शिखरसह पोहोचली देवदर्शनाला

मच्छीमार आणि तटरक्षक ताबडतोब घटनास्थळी गेले आणि त्यांनी चारही मृतदेह बाहेर काढले. हे विमान ग्रेनेडाइन्समधील बेकिया या छोट्या बेटावरून गुरुवारी मध्यरात्रीनंतर सेंट लुसियाला जात होते. ऑलिव्हर मुलींबरोबर नवीन वर्षानिमित्त व्हेकेशनसाठी इथे आला होता, अशी माहिती समोर आली आहे.

क्रिश्चियन ऑलिव्हरने आतापर्यंत ६० हून अधिक चित्रपट व टीव्ही मालिका केल्या आहेत. त्याच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे. ऑलिव्हर व त्याच्या मुलींना चाहते श्रद्धांजली वाहत आहेत.