Hollywood Actor Death हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जीन हॅकमन आणि त्यांची पत्नी बेट्सी या दोघांचेही मृतदेह त्यांच्या घरात आढळून आले आहेत. जीन हॅकमॅन हे ९५ वर्षांचे होते तर त्यांची पत्नी बेट्सी ६३ वर्षांची होती. या दोघांचे मृतदेह आणि त्यांच्या पाळीव श्वानाचा मृतदेह त्यांच्या घरात आढळून आले आहेत.

बुधवारी दुपारी जीन आणि त्यांच्या पत्नीचे मृतदेह आढळून आले

बुधवारी दुपारी १.४५ च्या सुमारास जीन आणि बेट्सी यांचे मृतदेह आढळून आले आहेत. या दोघांचा मृत्यू कशामुळे झाला ते कारण समजू शकलेलं नाही. या प्रकरणाचा पुढील तपास आम्ही करत आहोत अशी माहिती पोलिसांनी दिली. जीन आणि त्यांची पत्नी हे त्यांच्या मेक्सिको येथील घरात राहात होते. सांता फे चे काउंटी शेरीफ एडेन मेंडोज यांनी या दोघांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. शेरीफ मेंडोज यांनी सांगितलं की या दोघांचा मृत्यू कसा झाला? हे समजू शकलेलं नाही. तसंच या दोघांचा मृत्यू कधी झाला हे देखील त्यांनी सांगितलं नाही.

सांता फे या ठिकाणी वास्तव्य करत होते जीन हॅकमॅन

१९८० पासून जीन हॅकमॅन हे मेक्सिकोतल्या सांता फे या ठिकाणी राहात होते. १९९१ मध्ये त्यांनी बेट्सी यांच्याशी विवाह केला होता. या दोघांचा आणि त्यांच्या पाळीव श्वानाचा मृत्यू कसा झाला याचा शोध सुरु आहे. या दोघांचे मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. लवकरच या मृत्यूंमागचं गूढ उलगडेल अशी अपेक्षा आहे.

जॅन हॅकमॅन ऑस्कर विजेते अभिनेते

जेन हॅकमॅन हे सुप्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच त्यांनी ऑस्करही मिळवला आहे. त्यांचं चित्रपट सृष्टीतलं योगदान खूप मोठं आहे. सुपरमॅन, फ्रेंच कनेक्शन, द रॉयल टेनेंबौम्स अशा चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. २००४ ला त्यांनी हॉलिवूड इंडस्ट्रीत काम करण्यापासून निवृत्ती घेतली. जीन यांच्या पत्नी बेट्सी क्लासिकल पियानिस्ट होती. १९६० पासून २००४ पर्यंत जीन हॅकमन हॉलिवूडमध्ये कार्यरत होते. द फ्रेंच कनेक्शन सिनेमासाठी त्यांना ऑस्कर देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. या सिनेमात त्यांनी पोपेय डॉयल ही भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

Story img Loader