बॉलीवूडची मस्तानी दीपिका पदुकोणने ६ वर्षांपूर्वी एका हॉलीवूड चित्रपटात काम केलं होतं. ‘ट्रिपल एक्सः द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटातून तिने हॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिच्यासोबत हॉलीवूड स्टार विन डिझेल मुख्य भूमिकेत होता. आता विन डिझेल व दीपिकाची चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे अभिनेत्याने शेअर केलेला एक फोटो आहे. त्याने दीपिकाबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“ते २० वर्षांपासून वेगळे राहायचे”, वडील रवींद्र महाजनींबद्दल लेक गश्मीरचा खुलासा; कारण सांगत म्हणाला, “त्यांच्याशी आमचं नातं…”

विनने दीपिकाबरोबर रिक्षात बसलेला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत दीपिका रोमँटिक पोज देतेय, तर विन तिच्याकडे पाहतोय. “भारतासारख्या अनेक अद्भुत देशांचा प्रवास केला आणि त्यांच्या सुंदर संस्कृतींचा अनुभव घेतला, त्यासाठी खूप खूप कृतज्ञ आणि धन्य वाटतंय. न्यूयॉर्कमधील एक नशीबवान मुलगा, सर्वांना खूप प्रेम” असं कॅप्शन देत विनने हा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, यापूर्वीही विनने दीपिकाबरोबरचा फोटो शेअर केला होता. दोघांनी एकत्र काम केल्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. आता विन डिझेलने शेअर केलेल्या या फोटोवर भारतीय युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. भारतीयांकडून तुला खूप सारं प्रेम, अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर त्याचे फॉलोअर्स त्याच्या या पोस्टवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.