हॉलीवूडमध्ये कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. हा ६३ वर्षांतील सर्वात मोठा संप असल्याचं म्हटलं जातंय. तीन महिन्यांपूर्वी कमी वेतन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे उद्भवलेल्या धोक्यामुळे लेखकांनी काम बंद केलं होतं. आता त्यांच्या संपामध्ये हजारो चित्रपट आणि टेलिव्हिजन कलाकारही सहभागी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मी स्त्रियांचा फक्त सेक्ससाठी वापर करतो”, राम गोपाल वर्मांनी ‘त्या’ प्रश्नावर अभिनेत्रीला दिलेलं उत्तर

वॉल्ट डिस्ने कंपनी आणि नेटफ्लिक्स स्टुडिओचे प्रतिनिधित्व करणार्‍या अलायन्स ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्सबरोबर कामगार युनियनचे नवीन लेबर अॅग्रीमेंट होऊ शकले नाही, त्यानंतर स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्डने संपात सहभागी होण्याची घोषणा केली. हा संप मध्यरात्री सुरू झाला. स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड १,६०,००० हजार कलाकारांचे प्रतिनिधित्व करते.

“अर्जुन कपूरचं करिअर संपलंय,” बॉलीवूड अभिनेत्याची टीका; म्हणाला, “तो घरात बसून मलायकाची…”

कलाकार संपात सहभागी झाल्याने अमेरिकेतील सर्व चित्रपट आणि स्क्रिप्टेड टेलिव्हिजन शोची निर्मिती थांबेल. ज्यांचे स्वतंत्र प्रॉडक्शन आहेत आणि जे युनीयन लेबर अॅग्रीमेंटमध्ये समाविष्ट नाहीत त्यांचं काम सुरू राहील. या संपामुळे ‘स्ट्रेंजर थिंग्ज’, ‘द हँडमेड्स टेल’ सारख्या लोकप्रिय मालिकांचं शुटिंग थांबलं आहे. संप असाच सुरू राहिल्यास अनेक चित्रपट देखील पुढे ढकलले जाऊ शकतात.

“आता कुणाविषयी प्रेम, आदर वाटत नाही”, मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट; म्हणाला, “तुमची राजकीय चिखलफेक…”

स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड टॉम क्रूझ, अँजेलिना जोली आणि जॉनी डेप यांच्यासारख्या ए-लिस्ट स्टार्ससह १,६०,००० कलाकारांचे प्रतिनिधित्व करते. मेरिल स्ट्रीप, बेन स्टिलर आणि कॉलिन फॅरेल यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी संपाला पाठिंबा दिला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hollywood actors writers go on strike know reason details hrc
Show comments