Kim Kardashian : जगप्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री किम कार्दशियन कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या कामासह खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी ती नेहमी चाहत्यांबरोबर शेअर करते. अशात किमच्या पायाला नुकतीच एक गंभीर दुखापत झाली आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
किमने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिच्या पायाला दुखापत झाल्याचे दिसत आहे. तसेच या फोटोवरून समजत आहे की, तिच्या डाव्या पायाला लागले आहे. पायाची हालचाल होऊ नये म्हणून तिचा पाय एका पट्टीने बांधला आहे. फोटो पाहून समजतेय की, अभिनेत्रीच्या पायाला जास्त लागलेले असणार. कारण- फोटोमध्ये ती कुबड्यांचा वापर करत असल्याचेही दिसत आहे.
हेही वाचा : प्रसिद्ध अभिनेत्री घरातील बाथटबमध्ये आढळली मृतावस्थेत
किम कार्दशियनने हा फोटो पोस्ट करीत “FML सुट्या एन्जॉय करताना पाय मोडला”, अशी कॅप्शन लिहिली आहे. त्यासह तिने या फोटोवर रागात असल्याच्या इमोजीसुद्धा शेअर केल्या आहेत. अशात तिला झालेल्या या दुखापतीबद्दल अद्याप तिच्या बहिणीने कोणतीही माहिती दिलेली नाही. किमचा पाय मोडल्याने त्यावर चाहत्यांकडून काळजी व्यक्त केली जात आहे. किमने तिच्या पोस्टमध्ये तिला ही दुखापत कशी झाली याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
जगप्रसिद्ध किम कार्दशियनला दुखापत होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीदेखील तिच्या पायाला दुखापत झाली होती. ‘द कार्दशियन’च्या एका एपिसोडमध्ये अभिनेत्रीने तिला या वर्षी जुलै महिन्यातसुद्धा पायाला लागले होते, असे सांगितले आहे. ती म्हणाली, “मी बाथरूममध्ये असलेल्या स्लायडिंगच्या दरवाजाला धडकले होते. त्यावेळी जोरात खाली पडले. माझी पायाची बोटे दरवाजात अडकली होती. मी खाली पडले तेव्हा त्यातून रक्त येऊ लागले आणि माझ्या पायाची बोटे फ्रॅक्चर झाली.”
हेही वाचा : “लैंगिक शिक्षणावर चित्रपट करण्याची कुणाची हिंमत आहे का?” सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांवर बोलताना अक्षय कुमारचा प्रश्न

मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
किमने पायाला दुखापत होण्याच्या एक दिवस आधीच तिच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला होता. त्याचे काही फोटोसुद्धा तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. फोटोंमध्ये ती मुलाला मिठी मारताना दिसत आहे. तिने हे फोटो पोस्ट करीत लिहिले, “मी आमचे हे फोटो पाहते, तेव्हा मला नेहमी असं वाटतं की, माझ्या मुलानं कायम अशाच पद्धतीने माझ्या जवळ असावं. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! मी तुझ्यावर फार जास्त प्रेम करते.” अभिनेत्रीने एक दिवस आधीच मुलाचा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे वाढदिवस साजरा करताना तिला दुखापत झाली असावी, अशी शंका चाहत्यांच्या मनात येत आहे.