सध्या बॉलिवूडच्या चित्रपटांना बॉयकॉट केले जात आहे. दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाच्या पुढच्या भागाच्या चित्रीकरणाला सुरवात झाली आहे. बॉलीवूडच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. हॉलिवूडमध्ये देखील सध्या एक वेगळं चित्र दिसत आहे. तब्बल चाळीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत आहे. आपल्याकडे देखील हॉलिवूडच्या चित्रपटांचा चाहता वर्ग आहे

हॉलिवूडमध्ये सामन्यतः रीमेक किंवा प्रिक्वेल अशी परंपरा असते. मात्र आता चित्रपटगृहांमध्ये जुने चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.यामागचे कारण सांगितले जात आहे की साधारण जून ते सप्टेंबर महिन्यात चित्रपटांची कमाई होत नाही. याकाळात तिकीटविक्री कमी होते तसेच नव्या चित्रपटांसाठी हा काळ योग्य नाही म्हणून चित्रपट गृहांमध्ये पुन्हा एकदा जुने हिट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

“जगभरातील प्रेक्षकांना…”; बॉलिवूड चित्रपट फ्लॉप होण्याची कारणं सांगत फरहान अख्तरने व्यक्त केलं मत

यात युनिव्हर्सलच्या “ई.टी. द एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल” चा समावेश आहे, ज्याने गेल्या आठवड्यात $१.०७ दशलक्ष कमावले. ‘मॅक अँड रीटा’ आणि ‘एमिली द क्रिमिनल’ सारख्या नवीन चित्रपटांपेक्षा जास्त कमाई या चित्रपटाने केली आहे. हा चित्रपट १९८२ साली प्रदर्शित झाला होता. स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

डिस्नेने मंगळवारी जाहीर केले की २०१६ ची “रॉग वन: ए स्टार वॉर्स स्टोरी” २६ ऑगस्ट रोजी एका आठवड्यासाठी थिएटरमध्ये परत दाखवण्यात येईल. युनिव्हर्सल स्टुडिओचा जॉज हा चित्रपट १९७५ साली प्रदर्शित झाला होता तो पुन्हा चित्रपटगृहांमध्ये सप्टेंबर महिन्यात पुन्हा प्रदर्शित होणार आहे. सोनी आणि मार्वलचा “स्पायडरमॅन: नो वे होम हा चित्रपट देखील याच दरम्यान दाखवला जाणार आहे. हा चित्रपट मागच्या वर्षी प्रदर्शित झाला होता. टॉप गन सारखे चित्रपट पुन्हा प्रदर्शित करणार आहेत.

करोनामुळे देखील अनेक जुने चित्रपट पुन्हा दाखवले जात आहेत. त्यामुळे हे देखील एक कारण असू शकते. कोणतेही नवे चित्रपट येत नसल्याने जुने चित्रपट प्रदर्शित होत आहेत चित्रपटगृहांना त्याचा फायदा होत आहे. पॅरामाउंटने जूनमध्ये घोषणा केली होती की १९९७ चा “टायटॅनिक” व्हॅलेंटाईन डे २०२३ च्या वेळेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.

Story img Loader