गेल्या काही दिवसांपासून ऑस्करसाठी भारताकडून दोन चित्रपटांमध्ये स्पर्धा लागली होती मात्र एका गुजराती चित्रपटाने यात बाजी मारली. ‘काश्मीर फाइल्स’, ‘RRR’ हे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले. प्रेक्षकांनीदेखील या चित्रपटाला पसंती दर्शवली होती. मात्र ऑस्करच्या वारीत हे चित्रपट मागे पडले. राजमौली यांचा आरआर आर चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटावर हॉलिवूड चित्रपट निर्माते अॅडम मॅके यांनी आपले मत मांडले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अॅडम मॅके यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात ते असं म्हणाले आहेत ‘ही फसवणूक आहे. पण त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे नामांकन मिळेल याची खात्री करूया. आम्ही रोझ बाउल येथे स्क्रीनिंग करू शकतो का? (ते किती आश्चर्यकारक असेल?) #RRR.” असं त्यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे. यापूर्वी हॉलिवूडच्या नामांकित प्रकाशन व्हेरायटीचे वरिष्ठ संपादक क्लेटन डेव्हिस यांनीही ट्विटरवर आपली निराशा व्यक्त केली होती.

म्हणजे तिकीट दर कमी असतील तर … ” अभिनेता हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत

दरम्यान, RRR चे US वितरक, Dylan Marchetti यांनी सांगितले की ते चित्रपटाला समर्थन देणारी मोहीम सुरू करणार आहेत. अकादमीच्या १०,०० सदस्यांना सर्व श्रेणींमध्ये RRR ला मतदान करण्यासाठी बोलावण्याची त्यांची योजना आहे. ऑस्कर बाबतीत दिग्दर्शक राजमौली यांनी आधीच प्रतिक्रिया दिली होती, ते असं म्हणाले होते, ‘RRR ऑस्कर जिंको की किंवा न जिंको, पुढच्या चित्रपटाचा माझा प्लॅन बदलणार नाही. ऑस्कर (चित्रपटाच्या) युनिटसाठी आणि स्वतः देशासाठी मनोबल वाढवणारा ठरेल, पण त्यामुळे माझ्या कामाच्या पद्धतीत बदल होणार नाही. मला एक चित्रपट निर्माता म्हणून सतत अपग्रेड करण्याची गरज आहे. मला माझी कथाकथनाची साधने अपडेट करावी लागतील. आणि एका बाजूला, मला काय म्हणायचे आहे आणि मला कसे करायचे आहे ते बदलणार नाही.’

राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरसारखे सुपरस्टार या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. आलिया भट, अजय देवगण तसेच आपले मारठमोळे मकरंद देशपांडेसारखे मातब्बर कलाकारही या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसले होते. प्रेक्षकांनी ‘बाहुबली’इतकं प्रेम या चित्रपटावर जरी केलं नसलं तरी साऱ्या जगाने या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hollywood director adam mckay supports ss rajamoulis rrr calls oscar snub a travesty spg