टॉम हार्डि याची मुख्य भूमिका असलेला ‘वॉरियर’ हा चित्रपट हिंदीमध्ये बनविण्यात येणार आहे. लायन्सगेट आणि इंडिमॉल इंडिया या मोठ्या निर्मिती कंपन्या आयडेन्टिटी मोशन पिक्चर या बॅनरअंतर्गत हिंदी चित्रपटाची निर्मिती करण्यात येईल.
‘वॉरियर’ या मूळ चित्रपटाचे दिग्दर्शन गॅवीन ओकोन्नोर यांनी केले होते. या चित्रपटाची कथा संबंधांतील दुरावा आणि त्याच्याशी सामना करत असलेल्या दोन भावांवर आधारित आहे. ‘वॉरियर’च्या हिंदीतील चित्रपट निर्मितीचे काम डिसेंबरपासून सुरु होण्याची शक्यता असून यात भूमिका करणा-या कलाकारांच्या शोधास सुरुवात झाली आहे.
आणखी वाचा