लासे हॉलस्ट्रम या दिग्दर्शकाच्या चित्रपटांशी परिचित असणाऱ्यांना त्यांच्या चित्रपटातील लक्ष वेधून घेणाऱ्या काही बाबींवर एकमत होऊ शकते. पहिली बाब ते कुटुंबाशी संबंधित सूक्ष्मदर्शी शोध घेणारे मेलोड्रामिक असतात. ते पहिल्या फ्रेमपासून तुमची पकड घेणारे असतात आणि विशिष्ट काळाचा पट मांडून ते प्रेक्षकाला भावस्पर्शी अनुभव देणारे असतात. जॉनी डेप आणि गतिमंद मुलाच्या भूमिकेतील लिओनाडरे डिकॅपरिओ (टायटॅनिकआधी) यांची भूमिका असलेल्या ‘व्हॉट्स इटिंग गिल्बर्ट ग्रेप’ या अमेरिकी खेडेगावातल्या गरीब, स्थितिशील कुटुंबाची गोष्ट सांगणाऱ्या चित्रपटापासून हॉलस्ट्रम यांची अमेरिकी कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर खिळवून ठेवणाऱ्या कादंबऱ्यांच्या आधारे त्यांनी अनेक यशस्वी चित्रपट बनविले. यात ‘चॉकलेट’, ‘द शिपिंग न्यूज’, ‘द सायडर हाऊस रुल्स’, ‘अॅन अनफिनिश्ड लाइफ’, ‘द होक्स’, ‘डिअर जॉन’, ‘सॉलमॉन फिशिंग इन द येमेन’, ‘द हण्ड्रेड फूट जर्नी’ यांचा समावेश आहे. लोकप्रिय कादंबऱ्यांवर तेवढय़ाच ताकदीचे चित्रपट बनण्याच्या मोजक्या उदाहरणांमध्ये हॉलस्ट्रम मोडतात. विल्यम ब्रुस कॅमेरॉन यांच्या ‘ए डॉग्ज पर्पज’ या २०१० साली प्रकाशित झालेल्या कादंबरीवर हॉलस्ट्रम यांनी या वर्षी बनविलेला चित्रपट काही दिवसांपूर्वी उलटसुलट गोष्टींमुळे प्रचंड गाजत होता. इतका की पुन्हा दोनेक महिने या कादंबरीच्या विक्रीने खपाची सर्वोच्च आकडेवारी गाठली. अजूनही पुस्तकाची तडाखेबंद विक्री होत आहे आणि या चित्रपटाचे प्रेमी वाढत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा