सिनेमा पाहताना किंवा पाहण्यासाठी निवडताना आपण निश्चितच काही अंतर्गत उपजत निकषांना कवटाळतो. दर एक चित्रपट आपल्याला १०० टक्के मनोरंजन देऊ शकत नाही, कारण निवडलेल्या चित्रपटाने दीड-दोन तासांच्या कालावधीतील आपल्या मनातील अपेक्षित कसोटय़ांवर नेहमीच उतरणे अशक्य असते. चित्रपटाने एकाच वेळी दर्शकाच्या दृष्टिकोनातील साऱ्या भावभावनांना पोषण देणाऱ्या गोष्टी आणाव्यात आणि दृश्यीक, पटकथात्मक, अभिनयात्मक, संगीतात्मक घटकांतील सवोत्तम अनुभव सादर करावा, म्हणजे सिनेमा त्या वेळेपुरता प्रेक्षकाच्या मन:पटलावर नोंदला जातो. सिनेमाने ब्लॉकबस्टरसह कलात्मकही असावे आणि वेगासोबत संयत अवस्थाही दाखवावी अशा अनेक सर्वसामान्य दृष्टिकोनातून सिनेमाकडे रंजनशोधक पाहतात. भारतीय ‘सिनेरसिकां’ची विचारधारा या सर्व बाबींनीच शंभर वर्षे पोसली गेली असल्याने विशिष्ट कलाकारांचे चित्रपट शंभर कोटींचा व्यवसाय करतात तर अन्य बहुतांशांच्या माथी कितीही चांगला सिनेमा बनविला तरी अल्पदर्शकांचे ‘भाग्य’ लिहिलेले असते. कुणालाही साधी गोष्ट ऐकायची नसते तर ‘हटके’ अन् ‘आगळीवेगळी’च कथा पडद्यावर पाहायची असते. अमेरिकी चित्रसृष्टी आपल्याला जशी बिग-बजेटी, ब्लॉकबस्टरी, स्पेशल इफेक्ट्सनी नेत्रदीपक सिनेमांची कर्मभूमी म्हणून माहिती आहे, तशी प्रयोगशील सिनेमांची पुरस्कर्ती म्हणून कमी ज्ञात आहे. वितरणकृपेने आपल्याकडे तेथील बडय़ा स्टारकास्टचे आणि बरी तिकीटविक्री होऊ शकणारे सुपरमॅनी चित्रपट झळकतात. त्याहून चांगले चित्रपट असूनही इथल्या दर्शक विचारधारेच्या भीतीने आणलेच जात नाहीत. ही कोंडी गेल्या काही वर्षांत इंटरनेट, नेटफ्लिक्स युगामध्ये फुटू पाहत असल्याने आता मनोरंजन निवडीचे अगणित पर्याय निर्माण झाले असून प्रेक्षकांना ‘फार थोर’ आणि ‘फार साधा’ यापलीकडे मनरंजनाची पुरेपूर सेवा उपलब्ध करून देणाऱ्या आडवाटेच्या चित्रपटांची रांगच निर्माण झाली आहे. ‘फ्लोरिडा प्रोजेक्ट’, ‘लेडीबर्ड’ यांच्याइतकी मान्यता किंवा रेटिंग्ज मिळाले नसले तरी साधी गोष्ट मांडून त्या पंगतीत शिरकाव करणाऱ्या ‘प्लीज स्टॅण्ड बाय’ नामक चित्रपट हा त्या रांगेतला एक साजेसा सिनेमा आहे.
साधी गोष्ट!
सिनेमा पाहताना किंवा पाहण्यासाठी निवडताना आपण निश्चितच काही अंतर्गत उपजत निकषांना कवटाळतो.
Written by पंकज भोसले
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-02-2018 at 01:55 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hollywood movie please stand by