हॉलिवूडचा गायक आणि गीतकार Chris Brown हा लोकप्रिय आहे. ख्रिसवर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. पीडित महिलेने ख्रिसवर कॅलिफोर्नियामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेचा दावा आहे की, गायकाने आधी तिला अंमली पदार्थ दिले आणि नंतर मुघल डिडिच्या फ्लोरिडा येथील एका यॉटमध्ये तिच्यावर बलात्कार केला.

पीडित महिलेने आरोप केला की गायक ख्रिस ३० डिसेंबर २०२० रोजी मियामीला पोहोचला. त्यानंतर त्याने तिला तिथे बोलावले. ख्रिसने तिला काहीतरी प्यायला दिले, ते पिल्यानंतर त्या महिलेला अस्वस्थ असल्यासारखे वाटू लागले. त्यानंतर ख्रिसने तिला एका बेडरुममध्ये नेले, तिने विरोध केला तरी ख्रिसने तिच्यावर बलात्कार केला. आता पीडित महिलेने ख्रिसकडून २० मिलियन डॉलरची मागणी केली आहे.

आणखी वाचा : अक्षयचा पांढऱ्या दाढीतील फोटो शेअर करत ट्विंकल म्हणाली, “आपला माल तर…”

आणखी वाचा : इंटरनेट स्पीडवरून रितेशने जिनिलियाला मारला टोमणा, पाहा मजेशीर व्हिडीओ

पीडित महिलेने न्याय मागितला आहे. ज्यांच्यासोबत ख्रिस ब्राउनने असे केले त्यांच्यासाठी ती एक उदाहरण असेल अशी तिला आशा आहे. तर त्या महिलेने असेही सांगितले की दुसऱ्या दिवशी ख्रिसने फोनकरून गर्भधारणा टाळ्यास सांगितले.

Story img Loader