सध्या हॉलिवूडमधील अनेक कलाकार भारतीय गोष्टींच्या बाबतीत आपली मत मांडायला लागले आहेत. ऑस्करसारख्या मानाच्या पुरस्कारांमध्ये राजमौली यांच्या ‘RRR’ चित्रपटाला स्थान न मिळाल्याने चक्क हॉलिवूडमधील काही निर्माते एकत्र येऊन याचा निषेध वर्तवत आहेत. दुसरीकडे हॉलिवूडचा प्रख्यात दिग्दर्शक जॉन क्यूसैक याने राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला आहे. ‘सेरेन्डिपिटी’, ‘हाई फिडेलिटी’, ‘कॉन एयर’ और ‘२०१२’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेला जॉन क्यूसैक सोशल मीडियावर आजकाल सक्रिय असतो.
जॉन क्यूसैकने ५६ वर्षीय अभिनेत्याने ट्विटरवर लिहिले की, “भारतीय खासदार राहुल गांधी काश्मीर ते केरळ प्रवास करत आहेत.” त्यावर एका यूजरने त्याला धन्यवाद असा रिप्लाय दिला आहे. त्याच यूजरला अभिनेत्याने पुन्हा रिप्लाय दिला आहे की, ‘होय – एकता – सर्वत्र सर्व फॅसिस्टांविरुद्ध.’ याआधीही या अभिनेत्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. याशिवाय त्यांनी नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे समर्थनही केले.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नेमकी आहे तरी काय?
देशात लोकसभा निवडणूक २०२४ साली होणार आहे. त्यासाठी काँग्रेस पक्षाने जोमात तयारी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’चे आयोजन केले आहे. कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबरला या पदयात्रेचा आरंभ झाला. या यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी तेथील नागरिकांना भेटत आहे. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसची भारत जोडी यात्रा १५० दिवसांत ३,५७० किमी अंतर पार करणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेची सांगता होणार आहे.
दरम्यान जॉन क्यूसैकने या अभिनेत्याने १९८० पासून चित्रपटामध्ये काम करण्यास सुरुवात केली. यानंतर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. २०२२ मध्ये तो शेवटचा ‘परसूट’ चित्रपटात दिसला होता.