अमेरिकन फेबल’ या चित्रपटात जगरहाटीच्या कुतूहलातून भारावलेली अकरा वर्षांची मुलगी सुरुवातीलाच भेटते. झोपण्यापूर्वी बाबाकडून गोष्ट ऐकण्याची तिला प्रचंड हौस आहे; पण ती गोष्ट कुठल्याही विषयाची असली तरी ती, सुखांतिकाच असावी ही तिची अट आहे. बाप-लेकीच्या अनन्यसाधारण वाटू शकणाऱ्या संवादप्रसंगाला चित्रपटाचे कथानक पुढे सरकविण्यात आत्यंतिक महत्त्व आहे, कारण शीर्षकात दडलेल्या ‘गोष्ट’ या संकल्पनेचा अत्याकर्षक विस्तार इथे पाहायला मिळतो. ही अकरा वर्षांची मुलगीच चित्रपटाची मुख्य व्यक्तिरेखा असल्याने तिच्या नजरेतून कुटुंबथरार आपल्यापर्यंत पोहोचतो. फक्त या थराराचा शेवट कसा असावा हे तिच्या हाती राहत नाही.
‘कुटुंबपट’ हे साधारणत: अठरा‘पगड’ मानसिकता असलेल्या व्यक्तिरेखांना एकत्र आणून विनोद करण्यासाठी किंवा एकमेकांवर कुरघोडी करण्यात स्वारस्य असलेल्या लोकांची क्षुद्र मानसिकता दाखवून देण्यासाठी केले जातात. जगभरातील कौटुंबिक टीव्ही मालिका या दोन घटकांच्या इंधनावरच तगून आहेत. कौटुंबिक चित्रपटही त्याला अपवाद नाहीत. तरीही ‘लिटिल मिस सनशाइन’, ‘बिग फिश’, ‘द रॉयल टिननबम्स’, अगदीच अलीकडचा ‘कॅप्टन फॅण्टास्टिक’ हे चित्रपट आवर्जून पाहाव्यात अशा कुटुंबकथा मांडताना दिसतात. मुळात अमेरिकी आणि ब्रिटिश कुटुंबसंस्था आपल्याइतकी मागास किंवा ढोंगी नसल्यामुळे या कुटुंबांचे प्रश्न आणि ते सोडविण्याचा आटापिटा हा मूलभूत नसतो. त्यामुळे चित्रपटांतूनही त्यांचा प्रश्नांशी संघर्ष नक्की कशाबाबत सुरू आहे हे जागोजागी स्पष्ट होते. सायमन पेग या ब्रिटिश अभिनेत्याचे गेल्या काही वर्षांतील ‘मॅन अप’, ‘अॅब्सोल्युटली एनििथग’ किंवा ‘रन फॅटबॉय रन’सारखे बऱ्यापैकी कौटुंबिक म्हणता येतील असे चित्रपट पाहिल्यासही हा मुद्दा स्पष्ट होईल.
‘अमेरिकन फेबल’ चित्रपटातही कुटुंबकथा आहे, पण ती सुखी-दु:खी, प्रचारकी, प्रबोधनकारी वळणांवरची नाही. इथली नायिका गिट्टी (पेटन केनडी) ही आपल्या वयसुलभ कुतूहलाने जग जाणू पाहते. ती शहरात नाही, तर विस्कॉन्सिनमधील एका खेडय़ात राहते. तिच्या मते भली मोठी शेती करणाऱ्या तिच्या वडिलांनी सांगितल्यानुसार ती राहत असलेले ठिकाण जगातील सर्वात सुंदर आहे, कारण तिने इतर जग पाहिलेलेच नाही; पण चित्रपट सुरू होतो तेव्हा टीव्ही आणि रेडिओवरून तिला दिसणारा भवताल काही बरा वाटत नाही. त्यांच्या खेडय़ाआसपासच्या ठिकाणी कर्ज थकल्यामुळे शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र सुरू झालेले असते. शहरीकरणाच्या नावावर अनेक बडय़ा उद्योजकांनी शेतजमिनी हस्तगत करण्याचा धडाका लावलेला असतो. या पाश्र्वभूमीवर शेतकरी आपल्या संपत्तीला लिलावात काढून देशोधडीच्या मार्गाला येऊन ठेपलेला असतो. अशाच एका लिलावात गिट्टीला तिचे वडील घेऊन जातात. तिथल्या वस्तू खरेदी केल्यानंतर नक्की काय घडते आहे, याची चाहूल तिला लागते.
पुढे आपल्या शेतातील चाराघरामध्ये तिला एका म्हाताऱ्या व्यक्तीला कोंडून ठेवल्याचा शोध लागतो. बातम्यांमधून ही व्यक्ती म्हणजे शेतकऱ्यांकडून जमिनी लाटणारा उद्योजक असल्याची माहिती तिला मिळते. सुरुवातीला दबकत गिट्टी या म्हाताऱ्याशी गप्पा मारते आणि नंतर तिची त्या व्यक्तीशी गट्टी होते. घरातल्या व्यक्तींशी लपवून ती त्याला मदत करते, त्याच्याशी संवाद साधते. या दरम्यान, घरातील वातावरण, आíथक प्रश्न, म्हाताऱ्या व्यक्तीचे अपहरण करून शेतघरात दडविण्यात सहभागी असलेली कुटुंबबाह्य़ गूढ महिला आणि गिट्टीचे स्वत:चे गोष्टींनी भारलेले भावविश्व यांची सरमिसळ होऊ लागते. त्यातून कुटुंबात सहजतेऐवजी आणखी गढूळ वातावरण निर्माण होते आणि चित्रपटातला थरारक वळण लाभते.
चित्रपटातील कथेचा काळ हा रोनाल्ड रेगन अमेरिकी अध्यक्ष असतानाचा आहे, पण त्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा, शेतीच्या समस्यांचा आणि विकासाच्या नावाखाली जमिनी हस्तगत करण्याचा प्रकार अमेरिकाच नाही, तर जगातील सर्वच भागांत आजही तितकाच तीव्रतेने घडत आहे. या चित्रपटात तीनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर सामाजिक संस्था आणि चर्चचा खेडय़ांतील कुटुंबांना भेटण्याचा आणि दिलासा देण्याचा धडाका आपल्याला अवाक् करून सोडू शकतो.
दिग्दर्शिका अॅन हॅमिल्टन हिचा हा पहिलाच चित्रपटीय प्रयत्न असून तो पहिला वाटू नये इतका निष्णात तयारीने घडला आहे. यातील खेडय़ाची, अमेरिकी शेतकऱ्याच्या गरिबीची आणि निसर्गाच्या उधळणीची कित्येक दृश्यांची मालिका मनावर कोरली जातील इतकी परिणामकारक आहेत. त्यासाठी अन् अभिरुचीत शून्य भर घालणाऱ्या कुटुंबकथा आपल्या छोटय़ा-मोठय़ा पडद्यांवर दररोज अनुभवण्यातून उसंत हवी असल्यास, हा चित्रपट चांगला पर्याय आहे.