‘केजीएफ १’ आणि ‘केजीएफ २’नंतर आता याच्या पुढच्या भागाबद्दल काहीच चर्चा नव्हती. प्रेक्षक याच्या पुढील घोषणेबाबत आतुर होते. चित्रपटातील मुख्य अभिनेता यशने तर मध्यंतरी एका मुलाखतीदरम्यान तो आता पुन्हा रॉकी भाईच्या भूमिकेत दिसणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. यामुळे चाहते चांगलेच नाराज झाले होते. आता मात्र याच्या पुढील भागाबद्दल एक नवी अपडेट समोर आली आहे अन् ही बातमी ऐकून सगळ्यांनाच अत्यानंद होणार ही नक्की.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, होम्बल फिल्म्स निर्मित ‘केजीएफ ३’ या चित्रपटाचे चित्रीकरण पुढील वर्षी म्हणजेच २०२४ पासून सुरू होणार आहे. होम्बल फिल्म्सचे मालक विजय किरगांडूर यांनी सुपरहिट केजीएफ मालिकेच्या पुढील भागाची रिलीज डेट नुकतीच जाहीर केली आहे. इतकंच नव्हे तर या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाची घोषणादेखील होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : जेव्हा ‘गदर २’च्या दिग्दर्शकाने बिकिनी परिधान करण्यास सांगितल्यावर नसीरुद्दीन शाह म्हणाले…

विजय यांनी ‘पीटीआय’शी संवाद साधताना याबद्दल मोठी अडपेट दिली. ऑक्टोबर २०२४ मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून २०२५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सध्या ‘केजीएफ ३’च्या प्री-प्रोडक्शनवर काम सुरू आहे अन् लवकरच याबाबत घोषणा होईल असंही त्यांनी जाहीर केली. या घोषणेमुळे या सीरिजचे चाहते अन् यशचे फॅन चांगलेच खुश झाले आहेत.

‘केजीएफ चॅप्टर १’ आणि ‘केजीएफ चॅप्टर २’ च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे तर, दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. चॅप्टर १ ने जगभरात २३८ कोटींची कमाई केली होती, तर दुसरीकडे ‘केजीएफ २’ ने १२१५ कोटी कमावत इतिहास रचला होता. आता तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.