कुठे भेटलात दोघं? कसं जमलं? तुमच्या मिस्टरांना कशी हाक मारता? कुणी कुणाला आधी लग्नासाठी विचारलं? दोघांपैकी कोण जास्त चिडतं? असे अनेक प्रश्न विचारत घराघरात रंगणारा कार्यक्रम म्हणून होम मिनिस्टरकडे पाहिले जाते. होम मिनिस्टर या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते आदेश बांदेकर घराघरात प्रसिद्ध आहेत. नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आदेश बांदेकर यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
आदेश बांदेकर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी त्यांच्या आडनावाचा गैरवापर करत फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावधानता बाळगा, असे आवाहन केले आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी ‘काळजी घ्या’ असे सांगितले आहे.
“मी सिलेंडरवर बसून होम मिनिस्टरचा तो एपिसोड शूट केला”, आदेश बांदेकरांनी सांगितला किस्सा
“बांदेकर हे आडनाव किंवा या आडनावाशी साधर्म्य साधणारे बरेचजण मनोरंजनाबरोबर विविध क्षेत्रात वावरत आहेत. यापैकी कोणाशीही व्यवहार करताना काळजी घ्यावी. माझे नातेवाईक आहे असं सांगून कोणी आपली फसवणूक केल्यास त्याच्याशी माझा कोणताही संबंध नसेल,” अशी पोस्ट आदेश बांदेकर यांनी शेअर केली आहे.
“…अन् उरलं सुरलं अवसान गळून गेलं”, गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या अभिनेत्री जुई गडकरीची पोस्ट चर्चेत
दरम्यान आदेश बांदेकर यांची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. यापूर्वीही अनेक मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांनी याबाबतची पोस्ट शेअर करत चाहत्यांना सावध राहण्याचे आवाहन केले होते.